मुंबई : जर तुम्हाला एसी, टीव्ही, फ्रीज खरेदी करायचा असेल, तर आताच करा, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. १ एप्रिलपासून एसी, टीव्ही, फ्रीज, कूलर यांसारख्या अनेक गोष्टींचे दर वाढणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये झालेल्या वृद्धीमुळे ही दरवाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एप्रिलआधी जर तुम्ही या गोष्टींची खरेदी केली, तर तुम्हाला महागाईचा फटका बसणार नाही.


जागतिक बाजारात LED TV च्या किंमतीत वाढ


LED टीव्हीच्या किंमतींमध्ये एप्रिलपासून वाढ होणार असल्याचं बोललं जातंय. कारण जागतिक बाजारात एलईडी टीव्ही हे ३५ टक्क्यांनी महाग झाले आहेत. पॅनासॉनिक, हायर, थॉमसनसारख्या ब्रँडच्या टीव्हीची किंमत वाढू शकते.


वाढलेली कस्टम ड्युटी, महाग कॉपर, अल्युमिनिअम, स्टीलमुळे इनपुट कॉस्टसुद्धा वाढली आहे. तसंच समुद्र, हवाई वाहतूकमार्गही महागले आहेत. या सगळ्याचा परिणाम टीव्हीच्या किंमतींवर पडू शकतो.


एसी-पंखाही महाग होणार


एसी तयार करणाऱ्या कंपन्या ४ ते ६ टक्क्यांनी दरवाढ करण्याच्या विचारात आहेत. म्हणजेच प्रति युनिट एसीची किंमत १,५०० त २ हजाराच्या घरात होऊ शकते. तांबेदेखील महागल्यामुळे पंखे तयार करणाऱ्या कंपन्याही दरवाढ करणार आहेत.


जर ही भाववाढ झाली, तर २०२१ मध्ये अप्लायन्सेसच्या किंमतीत झालेली ही दुसरी दरवाढ असणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात अप्लायन्सेसच्या अनेक कंपन्यांनी जवळपास २० टक्के दर वाढवलेले होते.


आता कच्च्या मालाच्या किंमतीतल वाढ, कोरोना काळ आणि चीनमधील कच्च्या मालाच्या आयातीत झालेली घट या सगळ्याचा परिणाम १ एप्रिलपासून एसी, टीव्ही, फ्रीज, कूलरसारख्या गोष्टींच्या किंमतीवर पाहायला मिळणार आहे.