मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. जिओनं ग्राहकांना फुकट सुविधा देऊन या स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेमध्ये आता वोडाफोन-आयडिया आणखी पुढे गेलं आहे. वोडाफोन-आयडियाचं मर्जर झाल्यानंतर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी होईल. मर्जर झाल्यानंतर वोडाफोन-आयडिया ग्राहकांना अशी ऑफर देऊ शकते जी जिओनंही आत्तापर्यंत दिलेली नाही. आत्तापर्यंत जिओ आणि एअरटेलमध्येच ही स्पर्धा सुरु होती. पण आता यामध्ये वोडाफोन-आयडियाची भर पडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या सुविधा मार्च २०१९ पर्यंत आहेत. जिओप्रमाणेच वोडाफोन-आयडियाही जिओप्रमाणेच त्यांच्या ग्राहकांना मेंबरशिप प्लान देऊ शकते. एवढच नाही तर सध्याच्या प्लानच्या किंमतीही कमी होतील.


३० टक्क्यांपर्यंत कमी होणार किंमती


वोडाफोन-आयडियाच्या मर्जरनंतर किंमती ३० टक्क्यांपर्यंत कमी होतील, अशी माहिती मिळत आहे. याचबरोबर व्हॅल्यू अॅडेड सर्विस म्हणजेच जास्तीच्या सुविधाही ग्राहकांना मिळतील. पोस्टपेड ग्राहकांसाठी बिलावर सूट मिळेल तर प्रिपेड ग्राहकांसाठीही मोठ्या प्लानची घोषणा होण्याची शक्यता आहे.