बाजारात लवकरच येणार रेडमी ७ ! पाहा फिचर्स
...रेकॅार्ड रचले आहे
मुंबई: शिओमी लवकरच बाजारात रेडमी ७ लॅान्च करणार आहे. हा फोन रेडमी ६ चे अपडेटेड व्हर्जन आहे. या आधी कंपनीने ६ प्रो लॅान्च केला होता. या नवीन फोनचे नाव रेडमी ७ किंवा रेडमी ७ प्रो असे देण्यात येऊ शकते. या फोनला चीनच्या सर्टिफिकेशन वेबसाईट टीनाच्या यादीत टाकण्यात आले आहे.
रेडमीचा हा फोन एमआययूआय १० अॅन्ड्राईड वर काम करणार आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. शिओमी ७ मध्ये इंटर्नल मेमरी १२८ जीबी असणार आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये २.३ गिगाहर्ट्जचा असणार आहे. कंपनीने या फोनचे जास्त रंगामध्ये अनावरण केल्याचे रेकॅार्ड रचले आहे. हा मोबाईल फोन सिल्व्हर, ब्लॅक, व्हाईट, ब्लू, रेड, पिंक , ग्रीन, गोल्ड, पर्पल आणि ग्रे रंगात लॅान्च करण्याची शक्यता आहे. या आधी आयफोन एक्स आर ला ६ रंगात लॅान्च केले गेले होते.
स्पेसिफिकेशन्स
शिओमीच्या या फोनमध्ये २ सीम असणार आहेत. तसेच या फोनमध्ये अॅन्ड्राइड ८.१ ओरियो व्हर्जन देण्यात आले आहे. या फोनची सीम ५.८४ इंच असून, फूल एचडी डिस्प्ले असणार आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
शिओमीच्या फोन ३ प्रकारात लॅान्च होणार आहे. त्यात ३ जीबी, ४ जीबी, ६ जीबी रॅममध्ये तो उपलब्ध होणार आहे. रिअर कॅमेरामध्ये प्रायमरी सेन्सर १२ मेगापिक्सल आहे. सेल्फी सेन्सर ८ मेगापिक्सल असणार आहे. फोनची बॅटरी २९०० एमएएच देण्यात आली आहे.
२४ डिसेंबर ला बिजींगमधील एका कार्यक्रमात कंपनी हा गेमिंग फोन लॅान्च करण्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमात रेडमीच्या ७ सीरीजला देखील लॅान्च करण्यात येऊ शकते.