मुंबई : जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, त्यात तुम्ही रिअलमीमध्ये एखादा मिड-रेंज स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कंपनीने आपले दोन लोकप्रिय स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro च्या किंमतीत दोन हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. किंमत कमी केल्यानंतर, Realme X7 ची किंमत 21 हजार 999 रुपयांवरून 19 हजार 999 रुपयांवर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच जर आपण Realme X7 Proच्या किंमती बद्दल बोललो, तर त्याची सुरुवातीची किंमत  29 हाजार 999 रुपये होती, जी आता 26 हजार 999 रुपये झाली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या कार्निवल सेलमध्ये कमी किंमतीसह उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोनवर उपलब्ध असलेला हा सर्वोत्तम करार मर्यादित काळासाठी आहे.


Realme X7 ची फीचर आणि स्पेशिफिकेशन्स


फोनमध्ये कंपनी 6.43-इंच फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले देत आहे. 8 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंसिटी 800U चिपसेट देण्यात आला आहे.


फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 64  मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसरसह 8-मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.


फोनला पावर देण्यासाठी, यात 4310mAh ची बॅटरी आहे, जी 50W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.


Realme X7 Pro फीचर आणि स्पेशिफिकेशन्स


8 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह सुसज्ज, कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1000 प्लस प्रोसेसर ऑफर करत आहे.


डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले, तर तुम्हाला फोन मध्ये 6.55 इंच सुपर AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.


फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 4 रियर कॅमेरे आहेत. यात 64  मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसरसह 8-मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.


हा फोन 4500mAh बॅटरीद्वारे सुसज आहे आणि 65W सुपर डार्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.