मुंबई : 'रीयलमी'ने Realme आज ६४ मेगापिक्सल कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन भारतातील पहिला ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा एक्सपर्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत १५ हजार ९९९ रुपये इतकी ठेवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रीयलमी'चा हा पहिला एक्स सीरीज स्मार्टफोन आहे, जो न्यू आय डिझाइन हायपरबोला लाइट इफेक्टवर आधारित आहे. हा फोन १६ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवर realme.com/in विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.


realme XT किंमत


४ जीबी + ६४ जीबी - १५,९९९ रुपये
६ जीबी + ६४ जीबी - १६,९९९ रुपये
८ जीबी + १२८ जीबी - १८,९९९ रुपये
 
काय आहेत ' Realme XT'ची वैशिष्ट्ये -


- ६.४ इंची डिस्प्ले
- ८ MP+६४ MP+२ MP+२ MP चार कॅमेरा सेटअप
- फ्रन्ट १६ MP sonyIMX471  कॅमेरा 
- फोनमध्ये लेटेस्ट इन डिस्प्ले फिंगर प्रिंट्स स्कैनर Goodix 3.0
- snapdragon 712 AIE प्रोसेसर
- ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रॉम
- ४००० mAh बॅटरी 
- जलद चार्जिंगसाठी VOOC 3.0  टेक्नोलॉजी


realme XT पर्ल व्हाइट आणि पर्ल ब्लू या दोन रंगात उपलब्ध आहे. रीयलमीचा हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्याच्या बॅक साइटला ३डी बेंडिंग गोरिला ग्लास ५ लावण्यात आली आहे. फोनच्या फ्रन्टलाही कॉर्निंग गोरिला ग्लास ५ लावण्यात आली आहे.