नवी दिल्ली : चीनची नामांकीत मोबाईल कंपनी शाओमी (Xiaomi)ने डिसेंबरमध्ये स्मार्टफोन रेडमी 5 (Redmi 5) लॉन्च केला. त्यावेळेस फोनमध्ये 2 GB आणि 3 GB रॅम होती. 2 GB रॅम असलेल्या रेडमी 5 मध्ये 16 GB चे इंटरनल स्टोरेज आहे आणि 3 GB रॅम असलेल्या फोनवर 32 GB मेमरी आहे. आता कंपनीने याचे अजून एक वेरिएंट लॉन्च केले आहे. यात रॅम अधिक आहे.


व्हेरिफिकेशनमध्ये बदल नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेम खेळण्यासाठी आणि व्हिडिओसाठी हे नवीन व्हर्जन चांगला प्रतिसाद देईल, असा कंपनीने दावा केला आहे. नवीन फोनमध्ये 4 GB रॅम दिली आहे. मात्र याची मेमरी 3 GB रॅमच्या फोन इतकी आहे. Xiaomi Redmi 5 च्या नव्या 4 GB रॅमच्या व्हेरिएंटमध्ये 32 GB स्टोरेज आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि रोज गोल्ड रंगात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त यात बाकी काही बदल करण्यात आलेले नाहीत.


१०,००० पासून किंमत सुरू


चीनमध्ये १,०९९ युआन म्हणजे ११,००० रुपये इतकी या फोनची किंमत आहे. भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याची माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. भारतीय बाजारात याची किंमत १०,००० रुपये असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. रेडमी 5 मध्ये 5.7 इंचाची 720x1440 पिक्सल रिजोल्युशनचा एचडी डिस्प्ले आहे. यात स्नॅपड्रेगन 450 प्रोसेसर आहे. याची मेमरी तुम्ही मायक्रो एसडी कार्डने वाढवू शकता.


 3300 mAh ची दमदार बॅटरी


 फोनमध्ये 12 MP चा रियर आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यात 3300 mAh ची दमदार बॅटरी आहे. या फोनमध्ये ब्युटीफाय 3.0 अॅप दिला आहे. हा फोन अॅनरॉईड 7.1 नूगावर आधारित मीयूआय 9 वर चालतो.