नवी दिल्ली :  तेलापासून टेलिकॉम सेक्टरमध्ये आपलं बस्तान बसवेल्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड'च्या निव्वळ नफ्यात २५ टक्के वाढ झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिसेंबर महिन्यात समाप्त झाले्या तिमाहीत कंपनीनं ९४२३ करोड रुपयांचा नफा कमावलाय. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीनं ७५३३ करोड रुपयांचा नफा कमावला होता. 


उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रिजच्या टेलिकॉम कंपनी 'रिलायन्स जिओ'नंही २०१७-१८ च्या तिसऱ्या तिमाहीत नफा कमावलाय. जिओला ५०४ करोड रुपयांचा नफा मिळालाय. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत जिओला २७१ करोड रुपयांचा तोटा झाल्याचं दिसत होतं... महत्त्वाचं म्हणजे, स्थापन झाल्यापासून जिओनं पहिल्यांदाच नफा कमावलाय.   


या अहवालानंतर, पेट्रोकेमिकल सेक्टरमध्ये विस्ताराच्या संधी खुणावत असल्याचं रिलायन्सचे एमडी मुकेश अंबानी यांनी म्हटलंय.