मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या प्रीडेड ग्राहकांसाठी नवीन शानदार ऑफर आणली आहे. 'हॉलिडे हंगामा ऑफर'नुसार तुम्हाला ३९९ रुपयांऐवजी केवळ २९९ रुपये मोजावे लागतील. तसेच १०० रुपये तात्काळ सूट मिळणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला माय जिओ अॅपवरुन रिचार्ज करावे लागेल. 'फोन पे'च्या माध्यमातून तुम्हाला पैसे द्यावे लागतील. या नव्या ऑफरचा लाभ आज १ जून ते १५ जून २०१८ पर्यंत मिळणार आहे.


वाढती स्पर्धा आणि..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ २०१६ला लॉन्च करण्यात आली. त्यानंतर कंपनीने एकापेक्षा एक ऑफर ग्राहकांसाठी आणल्यात. सध्या वाढती स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने १०० रुपये कॅशबॅक देण्याचे जाहीर केलेय. त्यामुळे ३९९ रुपयांऐवजी तुम्हाला २९९ रुपये मोजावे लागलती. तसेच इंस्टंट कॅशबॅक ऑफर दोन भागात मिळणार आहे. पहिली प्रीपेड ग्राहकांसाठी ५० रुपयांचे व्हावचर मिळेल. जे जिओ अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करतील.


डिस्काऊंट ऑफर


दुसरी ऑफर ही जिओ अॅपवरील फोन पे या माध्यमातून पेमेंट करतील त्यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी ५० रुपये कॅशबॅक मिळेल. जिओचे ३९९ रुपयांचे रिचार्ज ग्राहकांसाठी ८४ दिवसांसाठी असेल आणि दिवसाला १.५ जीबी डाटा मिळेल. म्हणजेच ग्राहकाला ८४ दिवसांसाठी १२६ जीबी डाटा मिळेल. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉलसोबत १०० एसएमएस प्रतिदिवस करता येणार आहे.


स्मार्टफोन खरेदी केल्यावर ऑफर


त्याशिवाय स्मार्टफोनवरही ऑफर देण्यात आली आहे. त्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी जे २ २०१८ आणि सॅमसंग गॅलेक्सी जे ७ यांच्या खरेदीवर ही ऑफर असणार आहे. यातील कोणताही फोन खरेदी केला तर जिओ आपल्याला २७५० रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. तसेच १०० जीबी ४ जी डाटाही मिळेल.


कंपनीची ही कॅशबॅक ऑफर माय जिओ एकाऊंटवरुन क्रेडिट होईल.  १९८ या २९९ रुपयांच्या ट्राफिक प्लानचे रिचार्ज करावे लागेल. सॅमसंग गॅलेक्सी जे २ २०१८ आणि गॅलेक्सी जे ७ डिओ यांना भारतीय बाजारात एप्रिलमध्ये लॉन्च करण्यात आलेय.