मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाल उडवून देण्यासाठी रिलायन्स जिओ आता आणखीन एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिओ लवकरच होम टीव्ही लॉन्च करणार आहोत. जिओची ही सर्व्हिस डीटीएच सर्व्हीस प्रमाणेच असेल. जिओ होम टीव्हीमध्ये यूझर्सला एचडी आणि एसडी डेफिनेशनमध्ये चॅनल पाहायला मिळतील... असा दावा मीडिया रिपोर्टस करत असले तरी अद्याप जिओ होम टीव्हीची कंपनीकडून मात्र अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टसनुसार, जिओ होम टीव्ही लॉन्च झाल्यानं भारतात डायरेक्ट टू होम (डीटीएच) क्षेत्रात क्रांती येऊ शकेल. केवळ 200 रुपयांत सर्व चॅनलचं पॅक ग्राहकांना मिळू शकेल. याशिवाय 400 रुपये मासिक भाड्यावर हाय डेफिनेशन चॅनल पाहायला मिळू शकतील. ही सर्व्हिस एनहान्स्ड मल्टिमिडिया ब्रॉडकास्ट सर्व्हिस (ईएमबीएमएस) तंत्रज्ञानावर आधारित असेल.


टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाची कंपनी लवकरच जिओ होम टीव्ही सर्व्हिस लॉन्च करेल. हे जिओ ब्रॉडकास्ट अॅपचं सुधारित व्हर्जन असेल. या अॅपची टेस्टिंग नुकतीच निवडक डिव्हाईसवर एचडी कंटेंट स्ट्रीम करण्यासाठी झाली होती. रिपोर्टनुसार, जिओच्या सर्व युझर्ससाठी हे फिचर रोलआऊट करेल. याला जिओ होम टीव्हीचं नाव दिलं जाईल. 


नोट : जिओनं मात्र या बातमीला दुजोरा दिलेला नाही.