मुंबई : रिलायन्स जिओनं त्यांच्या ४९१ रुपयांच्या प्रिपेड रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. जिओचा हा प्लॅन आता ४९९ रुपयांना मिळणार आहे. ४९१ रुपयांचा हा प्लॅन दिवाळीदरम्यान लॉन्च करण्यात आला होता. ९१ दिवसांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १ जीबी डेटा मिळत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपर्यंत जिओचा हा प्लॅन व्हॅलिड होता. यानंतर लगेचच कंपनीनं या प्लॅनची किंमत वाढवली. ४९९ रुपयांचा हा प्लॅन जिओच्या ४५९ रुपयांच्या प्लॅनसारखाच होता. जिओच्या ४५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ दिवसांमध्ये दरदिवशी १ जीबी इंटरनेट डेटा आणि फ्री व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे.


मोठ्या प्रमाणावर इंटरनेट डेटा वापरणाऱ्यांसाठी जिओनं ५०९ रुपयांचा प्लॅनही आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४९ दिवसांसाठी प्रत्येक दिवशी २ जीबी डेटा मिळणार आहे. तर ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा मिळेल.