रिलायन्स जिओ करणार उद्या मोठा धमाका
टेलीकॉम क्षेत्रातील एकानंतर एक धमाके करणारी कंपनी रिलायंस जिओ आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. २१ जुलैला जिओ सर्वात मोठा धमाका करु शकते. रिलायंस जिओची उद्या वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी स्वत: उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी मोठी घोषणा करु शकतात. ज्यानंतर पुन्हा एकदा टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये भूकंप होऊ शकतो. या बैठकीत जिओकडून सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन देखील लॉन्च करण्याची घोषणा होऊ शकते.
नवी दिल्ली : टेलीकॉम क्षेत्रातील एकानंतर एक धमाके करणारी कंपनी रिलायंस जिओ आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. २१ जुलैला जिओ सर्वात मोठा धमाका करु शकते. रिलायंस जिओची उद्या वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी स्वत: उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी मोठी घोषणा करु शकतात. ज्यानंतर पुन्हा एकदा टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये भूकंप होऊ शकतो. या बैठकीत जिओकडून सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन देखील लॉन्च करण्याची घोषणा होऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार रिलायंस इंडस्ट्री पुढच्या दोन वर्षामध्ये २० कोटी फीचर फोन विकण्याचा प्लान करत आहे. यासाठी रिलायन्स जिओ सर्वात कमी किंमतीत ४जी स्मार्टफोन आणणार आहे. जिओला 2G आणि 3G सब्सक्रायबर्सला आकर्षित करुन 4G मध्ये शिफ्ट करायचं आहे. यासाठी जिओ प्रत्येक हँडसेटवर 10 ते 15 डॉलर म्हणजेच जवळपास 700 रुपयांची सब्सिडी देणार आहे.
जिओच्या या स्मार्टफोनमध्ये रिलायंस जिओची जिओ टीव्ही, जिओ मनी यासारखे अॅप असणार आहेत. स्मार्टफोन सारखी मात्र यामध्ये टचस्क्रीन सुविधा नसेल. पण वायफाय सारख्या सर्व सुविधा यामध्ये असतील.
कंपनीची योजना हे फोन ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. याची घोषणा २१ जुलैला जरी झाली तरी तो ऑगस्टपर्यंत बाजारात येईल. पण याची विक्री जिओ स्टोरमधून केली जाणार की इतर फोन सारखी त्याची विक्री होईल. रिलायंसने अजून फीचर फोनची किंमत ठरवली नाही. पण हा फोन १००० ते १५०० रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.