Reliance Jio Air Fiber : रिलायन्स जिओ कंपनीकडून अखेर जबरदस्त घोषणा करण्यात आली आहे. Jio Air Fiber बाजारात आणण्याची घोषणा कंपनीने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर Reliance Jio ने आपल्या 5G  सर्व्हिसेसची अधिकृत घोषणा केली आहे.  Jio ची 5G सेवा सर्वात आधी मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि कोलकातामध्ये सुरु होणार आहे. या सर्व मेट्रो शहरांमध्ये यंदाच्या दिवाळीपर्यंत 5G सेवा सुरु होणार आहे. यासोबतच कंपनीने Jio Air Fiber सेवा देखील लॉन्च करणार असल्याचं सांगितलं आहे. 


नक्की Jio Air Fiber आहे तरी काय?


Jio Air Fiber ने बऱ्याच गोष्ट बदलणार आहेत. उदाहरणच द्यायचं झाल्यास, तुम्ही आवडीने पाहत असलेल्या क्रिकेट मॅचचा फील यामुळे बदलणार. हे एक असं डिव्हाइस असणार आहे ज्यामुळे तुम्ही बिना वायर कनेक्टिव्हीटी हाय स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकणार आहात. यामुळे तुम्ही तुमच्या घरातही WiFi हॉटस्पॉट देखील तयार करू शकणार आहात. 


कंपनी आपल्या 5G  सुविधेला Jio Air Fiber च्या मदतीने वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत आकाश अंबानी यांनी बोलताना या डिव्हाइसबाबत माहिती दिली. Jio Air Fiber या सिंगल डिव्हाइसच्या वापरामुळे तुम्हाला उत्तम इंटरनेट एक्सपीरियन्स मिळेल, याने घरात आणि ऑफिसमध्ये गिगाबाईट इंटरनेट स्पीड मिळणार आहे. 


कसे असतील प्लॅन्स? 


रिलायन्सकडून Jio Air Fiber ची घोषणा तर झाली आहे, मात्र कंपनीने याचे प्लॅन्स किती रुपयांचे असणार याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.


सोबतच याच्या Jio Air Fiber फंक्शनबाबतही संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. कंपनीच्या माहितीप्रमाणे डिसेंबर 2023 पर्यंत भारतातील सर्व शहरांमध्ये 5G कनेक्टिव्हीटी पोहोचवली जाईल असं कंपनीचं म्हणणं आहे.