Reliance Jio ने जारी केली एमरजन्सी डाटा लोन सुविधा; जाणून घ्या ग्राहकांना असा होईल फायदा
देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी एका विशेष सुविधेची घोषणा केली आहे.
मुंबई : देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी एका विशेष सुविधेची घोषणा केली आहे. जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या एमरजन्सी डाटा लोन सुविधा देणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना आता रिचार्ज आणि नंतर पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. नव्या सुविधेनंतर जिओ वापरकर्ते लगेच डेटा लोन घेऊ शकतील आणि नंतर त्याचे पैसे देऊ शकतील.
अनेकदा ग्राहकांचा डेली हायस्पीड डेटा समाप्त होतो. त्यानंतर रिचार्ज करायला अडचणी येतात. ग्राहक आता या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. जिओचे प्रीपेड वापरकर्ते एका वेळी १ जीबी एमरजन्सी डेटा लोन घेऊ शकतील.
एमरजन्सी डाटा लोन घेण्याची पद्धत
- सर्वात आधी Myjio ऍप सुरू करा. वर डाव्या कोनात Menu वर क्लिक करा.
- आता ८व्या क्रमांकावर emergency data वर सिलेक्ट करा
- येथे तुम्हाला 'Recharge Now, Pay Later' असा पर्याय दिसेल.
- पुढे प्रोसेसवर क्लिक करा
- पुढील पेजवर 'Get emergency data' या पर्यायावर क्लिक करा.
- एमरजन्सी लोनची सुविधा प्राप्त करण्यासाठी Activate Now वर क्लिक करा
- त्यानंतर तुमचा एमरजन्सी डेटा एक्टिवेट होईल