रिलायन्स घेऊन येणार जिओबूक....विंडोज नाही तर `या` सिस्टीमवर चालणार जिओबूक
कसा असेल जिओबूक?
स्वस्तात मस्त अशी ओळख झालेलं जिओ आता लॅपटॉपही आणण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. या लॅपटॉपचं नाव जिओबूक असं असण्याची शक्यता आहे. हा लॅपटॉप विंडोज नाही तर अँड्रॉईड सिस्टीमनुसार चालेल. त्याला JioOS असं म्हणण्यात येईल.
लॅपटॉपची गरज सध्या बहुतांश जणांना असतेच, त्यात वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानं अनेक जणांना त्यावरून काम करणं सोप्प पडतं. मात्र लॅपटॉपच्या किंमती या सर्वांनाच परवडणाऱ्या असतील असं नाही. अशात स्वस्तात डेटा प्लॅन आणणारं जिओ, आता स्वस्तात लॅपटॉप आणून लॅपटॉपच्या मार्केटमध्येही स्पर्धा तयार करतं का हे पाहावं लागेल.
जिओ बूकमध्ये 4G LTE ची जोड पण पाहायला मिळू शकते. जिओने जिओबुक तयार करण्यासाठी चिनी कंपनी ब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसह भागीदारी केली आहे. या कंपनीत आधीपासूनच जिओचे फोनही तयार करण्यात येत आहेत. एक्सडीए डेव्हलपर्सनी सांगितलंय की, जिओबुक मागील वर्षाच्या सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच विकसित करण्यात आला आहे आणि 2021 मध्ये तो कसा असेल, हे ग्राहकांना दिसण्याची शक्यता आहे.