मुंबई : सर्वात स्वस्त टॅरिफ प्लन देणारी रिलायन्स जिओ कंपनी नवीन वर्षात ग्राहकांना देणार झटका.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही जिओ युझर्स असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्हाला आठवत असेल गेल्यावर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये Jio ने आपले टॅरिफ प्लान महाग केले. आता तुम्हाला धक्का देणारी बातमी अशी आहे की, येणारे नवे प्लान देखील टॅरिफ आणि महाग असणार आहेत. नवीन रिपोर्टनुसार टेलीकॉम ऑपरेटर्समध्ये सुरू असलेला टॅरिफ वॉर लवकरच संपणार  आहे. 


या रिपोर्टने असा दावा केला आहे की, जिओ आपले टॅरिफ महाग करू शकतात. जिओने बाजारात येवून एक वर्ष झाल्यानंतर स्वस्त टॅरिफ ठेवले आहेत. अशात दुसऱ्या कंपन्यांनी देखील प्लान स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओच्या बाजारात येण्यानंतर भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये प्राइज वॉर जोरात सुरू झाले आहेत. आणि ओपन सिग्नल रिपोर्टने असे सांगितले आहे की, ही परिस्थिती पुढच्या वर्षी देखील अशीच असणार आहे. 


रिपोर्टनुसार, 4G मार्केटमध्ये जिओचा दबदबा कायम आहे. फ्री आणि डिस्काऊंट डाटा एका वर्षापर्यंत असल्यानंतर जियो २०१८ मध्ये सर्व्हिसच्या किंमतीत वाढ करू शकते. Cirisl च्या म्हणण्यानुसार, भारतात सध्या मोबाइल पेनेटरेशन रेट ४० टक्के आहे जो २०२२ मध्ये ८० टक्के होणार आहे. रिपोर्टमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की, LTE सर्व्हिसमध्ये लिडींग रोल प्ले केला जात आहे. आणि याचमुळे या वर्षात सतत डेटा युझर्स वाढले आहेत. हल्लीच जिओ कंपनीने नवीन प्लान बाजारात आणले आहेत. 


या प्लानला कंपनीने शाओमी Redmi 5A सोबत सादर केले आहेत. या प्लानच्या अंतर्गत १९९ रुपयांत प्रत्येक महिन्यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड एसएमएस अशी ऑफर दिली आहे. त्यामुळे एकूणच जिओ ग्राहकांना महागलेले प्लान देणार आहेत. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.