नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या डेटा आणि प्राईस वॉरचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओने पदार्पण केल्यानंतर हे सर्व बदल पहायला मिळत आहेत. कमी डेटा वापरणाऱ्यांपासून सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांना कंपन्या आपल्याकडे आकर्षित करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हालाही इंटरनेट डेटा प्लान खरेदी करायचा आहे मात्र, गोंधळात सापडलेत? मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला विविध टेलिकॉम कंपन्यांच्या प्लान संदर्भात सांगणार आहोत. या प्लान्समध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळतो. 


रिलायन्स जिओ 1.5 GB डेटा प्लान 


रिलायन्स जिओच्या सुरुवाती रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB 4G डेटा मिळणार आहे. जिओच्या 149 रुपये, 349 रुपये आणि 399 रुपयांच्या रिचार्ज प्लान्समध्ये युजर्सला दररोज 1.5 GB डेटा मिळतो. या सर्व प्लान्समध्ये अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधाही उपलब्ध आहे. मात्र, या सर्व प्लान्सची वैधता वेगवेगळी आहे हे लक्षात घ्या.


एअरटेलचा 1GB डेटा प्लान 


भारतीय बाजारात एअरटेलचे सर्वाधिक ग्राहक आहेत. रिलायन्स जिओच्या आक्रमक रणनितीनंतर कंपनीने आपल्या ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी विविध प्लान्स लॉन्च केले आहेत. एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर युजर्सला 70 GB चा 4G डेटा मिळतो. या ठिकाणी युजर्स दररोज 1 GB डेटा दररोज वापरु शकतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंगच्या सुविधेसोबतच ग्राहकांना 100 एसएमएस दररोज मिळणार आहेत. यासोबतच प्लानमध्ये फ्री रोमिंगची सुविधाही उपलब्ध आहे.


वोडाफोनचा 1GB डेटा प्लान 


वोडाफोन आणि एअरटेलचा 399 रुपयांचा प्लान एकसारखाच आहे. वोडाफोनच्या 399 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना त्याच सुविधा मिळणार आहेत ज्या एअरटेलकडून देण्यात येत आहेत. वोडाफोनच्या 399 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना 70 GB चा 4G डेटा मिळत आहे. म्हणजेच ग्राहक दररोज 1GB डेटा वापरु शकतात. या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंगच्या सुविधेसोबतच ग्राहकांना 100 एसएमएस दररोज मिळणार आहेत. या प्लानमध्ये फ्री रोमिंगची सुविधाही उपलब्ध आहे.


आयडिया 1GB डेटा प्लान


आयडियाच्या 199 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना दररोज 28 GB चा 4G  डेटा मिळणार आहे.  युजर्स प्रतिदिवस 1 GB डेटाचा वापर करु शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 100 SMS दररोज मिळतात. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे.