प्रजासत्ताक दिनी फ्लिपकार्टवर `रिपब्लिक डे सेल`; स्मार्टफोनवर मोठी सूट
कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के सूट देण्यात येणार आहे
नवी दिल्ली - इ-कॉमर्स वेबसाइट प्लिपकार्टने स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. या सेलची सुरुवात २० जानेवारीपासून होणार आहे. रिपब्लिक डे सेल दोन दिवस चालू असणार आहे. दरम्यान, स्मार्टफोनच्या आणि लॅपटॉपच्या खरेदीवर मोठी सूट देण्यात येणार आहे. एसबीआय कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर डेबिट कार्डवर इएमआयसारखी (EMI) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
रिपब्लिक डे सेलमध्ये सूट मिळणारी स्मार्टफोनची यादी खालीलप्रमाणे
झेनफोन ५ झेड – या स्मार्टफोनची किंमत ३२ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा स्मार्टफोन २४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकता. त्याचबरोबर मोबाइल संरक्षण योजना देखील मिळणार आहे.
मॅक्स प्रो एम१ – या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १० हजार रुपये आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन ८ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
ऑनर १० लाइट – एवढ्यातच लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तसेच ६ जीबी रॅम असलेला स्मार्टफोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ १३ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनवर ४ हजार रुपयाची बचत करता येणार आहे.
रिअल मी२ प्रो – हा स्मार्टफोन १३ हजार ९९० रुपयात लॉन्च केला होता. या स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच रिअलमी सी१ आणि रिअलमी सी२ वर देखील मोठी सूट देण्यात आली आहे.
ओपो एफ ९ – २०१८ मध्ये ओपो कंपनीने २ स्मार्टफोन बाजारात आणले होते. ओपो एफ ९ स्मार्टफोनची किंमत १६ हजार ९९० रुपये होती. सेलमध्ये हा स्मार्टफोन १२ हजार ९९० रुपयांत मिळणार आहे. तसेच ओपो एफ१ २५६ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोन २५ हजार ९९९ रुपयात उपलब्ध होणार आहे.
मोटो वन पॉवर - हा स्मार्टफोन सेलमध्ये १३ हजार ९९९ रुपयात विकला जाणार आहे. या स्मार्टफोनची खरी किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे.
नोकिया ६.१ प्लस - नोकियाचा हा स्मार्टफोन १५ हजार रुपयात लॉन्च केला होता. परंतु, सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये असणार आहे.