Apple Watch च्या मदतीने दरोडेखोरांनी लूटले 3.71 कोटी, कसं ते जाणून घ्या
जेव्हा या टोळीने कारचा पाठलाग केला, तेव्हा लूट शोधण्यासाठी बंदुकीने मागच्या खिडकीची मोडतोड केली.
लंडन : अमेरिकेतील दरोडेखोरांच्या गटाने एका व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी आणि चोरी करण्यासाठी Apple वॉचचा वापर केला. त्यानंतर या चोरट्यांनी या व्यक्तीकडून - $ 500,000 म्हणजेच (3.71 कोटी) रोख लुटले आहेत. ही घटना गेल्या वर्षीची आहे, जी आता काही दिवसांपूर्वी सार्वजनिक केली गेली. चला तर जाणून घेऊया की, ही चोरी कशी झाली आणि दरोडेखोरांनी कोणती पद्धत अवलंबली.
अॅपल वॉचच्या माध्यमातून 3.71 कोटी रुपये लुटले
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, दरोडेखोरांच्या गटाने त्यांच्या टार्गेट केलेली व्यक्ती "ड्रग ट्रॅफिकर" असल्याचे वाटले आणि हे खरे देखील ठरले. ज्यामुळे त्यांनी या व्यक्तीकडून पैसे लूटण्याचा विचार केला. या व्यक्तीच्या हॉटेलच्या खोलीच्या चाव्या चोरल्यानंतर दरोडेखोरांनी त्याच्या कपाटातून 5 लाख डॉलर चोरले आणि पळ काढला.
परंतु ही टोळी एवढ्यावरच थांबवली नाही, तर त्यांनी या व्यक्तीच्या कारच्या बंपरखाली अॅपलचा घड्याळ (Apple Watch) लावला. त्यांनी कारच्या खाली हे घड्याळ लावले, कारण त्यांना माहित होते की, हे एक अतिशय हलके साधन आहे आणि कोणालाही त्यावर संशय येणार नाही.
आता तुम्ही म्हणाल की, Apple वॉचचा काय संबंध, तर Apple वॉचमध्ये असलेल्या लोकेशन टॅगिंग सिस्टीममुळे तुम्हा कोणाचेही लोकेशन ट्रेस करु शकता.
कारच्या बंपरमध्ये Apple वॉच ठेवल्यानंतर, या टोळीने ऑरेंज काउंटीपासून कनेक्टिकटच्या हार्टफोर्डमधील हॉटेल पार्किंगपर्यंत त्यांच्या शिकाराचा पाठलाग केला. हा व्यक्ती कुठे थांबला आणि कितीवेळ थांबला ही सर्व माहिती या टोळीला या वॉचमुळे मिळाली असे फिर्यादीने आपल्या अहवालात सांगितले.
जेव्हा या टोळीने कारचा पाठलाग केला, तेव्हा लूट शोधण्यासाठी बंदुकीने मागच्या खिडकीची मोडतोड केली, परंतु काहीही सापडले नाही. त्यानंतर त्यांनी रात्रभर गाडीत शोधाशोध केली परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या टार्गेटला पाहिले, तेव्हा त्यांचा फोन, पाकीट आणि हॉटेलच्या चाव्या चोरल्या. त्यानंतर यांनी या व्यक्तीच्या हॉटेलच्या खोलीतून 500 डॉलर म्हणजे 3.71 कोटी रुपये रोख रक्कम असलेली बॅग उचलली.