Royal Enfield : जगभरात कमालीच्या लोकप्रिय असणाऱ्या Royal Enfield बाईक्सना भारतात प्रमाणाहून जास्तच प्रेम मिळालं आहे. कैक पिढ्यांपासून अनेकांच्याच प्राधान्यस्थानी असणाऱ्या या बाईकचे फिचर्स आणि त्या चालवताना मिळणारा आनंद काही औरच आहे, असं एनफिल्डप्रेमी म्हणताना दिसतात. या बाईक पाहताना त्याचा अंदाजही येतो. पण, मागील काही वर्षांमध्ये बाईकच्या टॉप मॉडेलचे दर प्रचंड वाढल्यामुळं ती घेण्याचा विचार काहींनी दूर सारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखोंच्या घरात किंमत असणारी ही बाईक चालवायची तर आहे, पण खिशाला मात्र ती परवडत नाहीये अशाच द्विधा मनस्थितीत तुमच्यापैकी अनेकजण असतील. पण, आता मात्र त्याचीही चिंता करण्याचं कारण नाही. ही बाईक तुम्ही आता भाड्यावरही घेऊ शकता. तेसुद्धा थेट एनफिल्डकडूनच. तुम्ही Royal Enfield Rental Program विषयी ऐकलं किंवा वाचलं आहे का?


काय आहे, Royal Enfield Rental Program ?


नावावरून लक्षात आलंच असेल की इथं तुम्हाला बाईक भाड्यानं घेण्याची मुभा मिळते. पण, त्यासाठी काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागते. रॉयल एनफिल्डची ही योजना सध्या देशातील निवडक शहरांमध्ये लागू आहे. यामध्ये दिल्ली, जयपूर, जैसलमेर, हरिद्वार, चेन्नई, देहरादून, मनाली, धरमशाला आणि लेहचा समावेश आहे. याव्यरिक्त इतरही शहरांचा यात समावेश असून हा आकडा 25 शहरं इतका आहे. भविष्यात यामध्ये आणखी शहरांची भर पडू शकते.


हेसुद्धा वाचा : Mahindra च्या फॅमिली कारची किंमत पुन्हा वाढली; आता डाऊनपेमेंटचं गणितही बिघडणार


 


रॉयल एनफिल्डच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 40 विविध रेंटल ऑपरेटरच्या माध्यमातून जवळपास 300 बाईक भाडे तत्तावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


बाईक रेंटनं घेण्यासाठी नेमकं काय करावं?


- Royal Enfield च्या संकेतस्थळावर भेट द्या.
- तिथं तुमचं शहर, पिकअपची तारीख (बाईक घेण्याची तारीख), ड्रॉप ऑफची तारीख (बाईक सोडण्याची तारीख) आणि वेळ नमूद करावी.
- निर्धारिचत वेळासाठी एनफिल्डकडून काही बाईक आणि उपलब्ध मॉडेलची माहिती तुम्हाला देईल. इथंच एका दिवसाचं भाडंही सांगिलं जाईल.
- पुढं बाईक निवडून एक ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला बाईक ऑपरेटरची माहिती दिली जाईल.


रॉयल एनफिल्डच्या बुलेटसाठी (Bullet) तुम्हाला 1200 रुपये आणि हिमालयन बाईकसाठी (Himalayan) 1533 रुपये प्रती दिवस इतकं भाडं तुमच्याकडून आकारलं जातं. ही सुरुवातीची किंमत असून शहरांनुसार दरांमध्ये काहीसा फरक आढळू शकतो. एनफिल्डच्या या सुविधेमुळं आता तुम्हाला थेट कंपनीकडून चांगल्यातली चांगली बाईक भटकंतीसाठी नेता येणार आहे. मग? तुम्ही कधी निघताय राईडला?