एनफिल्ड घ्यायचीये? आताच्या आता ही बातमी पाहा...
Royal Enfield कंपनीची सर्वात स्वस्त बाईक ओळख असलेली Royal Enfield Hunter 350 ही भारतात लवकरच लाँच होणार आहे. चला तर मग जाणू घेऊया Royal Enfield Hunter 350 या बाईकच्या फीचर्स आणि डिझाइन बद्दल...
मुंबई : Royal Enfield Hunter 350 बाईक येत्या 7 ऑगस्टला भारतात लाँच होणार आहे. ही बाईक लाँच होण्याआधीच कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरांनी Royal Enfield Hunter 350 चा एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आज आम्ही तुम्हाला या बहुचर्चीत असलेल्या Royal Enfield Hunter 350 च्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात...
Royal Enfield Hunter 350 चं डिझाइन
येऊ घातलेल्या Royal Enfield Hunter 350 बाईकचं डिझाइन खुप आकर्षीत आहे. यामध्ये टिअरड्रॉप फ्लू टॅक, स्पंकी पेंट स्कीम आणि डुकाटी स्कैम्बलर स्टाईल फ्लॅट, सिंगल सीट सारखे स्टाईल हायलाइट आहे.
याशिवाय, अपकमिंग बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोक्स, रिअरमध्ये ट्विन शॉक एब्जॉर्बर, 17 इंच चा अलॉय व्हील, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, डुअल चैनल ABS आणि ट्यूबलेस टायर मिळणार आहेत.
Royal Enfield Hunter 350 चे व्हेरियंट
रिपोर्ट नुसार, या बाईकची विक्री ही रेट्रो आणि मेट्रो अशा नावांच्या दोन व्हेरियंटमध्ये केली जाणार आहे. यामध्ये Hunter 350 Retro हा कमी किंमतीचा व्हेरियंट आहे. तसेच, Hunter 350 Metro या व्हेरियंटमध्ये जास्त फीचर्स असणार आहेत. याशिवाय, हंटर मेट्रोसोबत रिबेल नावाचा एक सब-व्हेरियंट देखील मिळणार आहे. यामध्ये, रिबेल ब्लॅक रिबेल ब्लू आणि रिबेल रेड हे तीन करल मिळणार आहेत.
Royal Enfield Hunter 350 चं इंजिन
रिपोर्ट नुसार, रॉयल एनफील्ड हंटर 350 च्या सर्व व्हेरियंटमध्ये 350cc, फोर स्ट्रोक लाँग स्ट्रोक इंजिनचा वापर केला जाणार आहे. हे इंजिन Meteor 350 या बाईकसोबत देखील मिळणार आहे. हे इंजिन 20bhp पावर आणि 27Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसोबतच 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड असेल. यामध्ये फ्यूल इंजेक्शन, ओवरहेड कॅमशाप्ट आणि बॅलेंसर शाफ्ट देखील मिळेल.
Royal Enfield Hunter 350 बाईकची किंमत
Hunter 350 रॉयल इनफील्डच्या लाईन-अपमध्ये सर्वात खाली येते. या बाईकची सुरुवातीची किंमत 1.6 लाख रुपयांपेक्षा (एक्स-शोरुम) कमी असू शकते. याचाच अर्थ असा की, Royal Enfield च्या इतर बाईकपैकी ही बाईक सर्वात स्वस्त असणार आहे.