मुंबई : सॅमसंगने नोव्हेंबर 2021 मध्ये टेक प्लॅटफॉर्मवर आपला बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A03 सादर केला. हा मोबाईल फोन 48MP कॅमेरा, 4GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,000 mAh बॅटरी सारख्या फिचर्ससह सादर करण्यात आला आहे. परंतु या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नव्हती. आता कंपनीने अधिकृतपणे Samsung Galaxy A03ची किंमत जाहीर केली आहे.


Samsung Galaxy A03 ची किंमत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगचा हा नवीन स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसात भारतीय बाजारातही येणार आहे. 


Samsung Galaxy A03 चा 3 GB RAM + 32 GB स्टोरेज व्हेरिएंट व्हिएतनाममध्ये VND 2,990,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे. भारतीय चलनानुसार हा स्मार्टफोन 9,781 रुपयांच्या आसपास आहे.


4 GB RAM + 64 GB स्टोरेज व्हेरिएंट VND 3,490,000 (सुमारे 11,400 रुपये) च्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.


Samsung Galaxy A03 विषयी डिटेल्स


Samsung Galaxy A03 च्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास, हा मोबाइल फोन 20:9 आस्पेक्ट रेशोवर सादर केला गेला आहे. 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD + वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.


हा फोन प्लास्टिकच्या बॉडीवर बनवला आहे. फोनची स्क्रीन PLS IPS पॅनलवर बनवली आहे. 


Samsung Galaxy A03 स्मार्टफोन Android 11 OS वर लॉन्च करण्यात आला आहे. 


स्मार्टफोनमध्ये 1.6 GHz क्लॉक स्पीडवर काम करणारा ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. तसेच Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे. सॅमसंगने हा फोन 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅमच्या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.