नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सॅमसंगने आपल्या दोन फोन्सच्या किमतींत मोठी सूट देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगने मार्च महिन्यात आपले गॅलक्सी A5 आणि A7 हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या दोन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे २६,९०० आणि ३०,९०० रुपये होती. मात्र, आता या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने जवळपास पाच हजार रुपयांनी कपात केली आहे.


सॅमसंग गॅलक्सी A5 हा २६,९०० रुपयांचा स्मार्टफोन २२,९०० रुपयांत उपलब्ध होत आहे. तर सॅमसंग A7 हा ३०,९०० रुपयांचा फोन २५,९०० रुपयांत तुम्ही खरेदी करु शकणार आहात.


सॅमसंगचे हे दोन्ही फोन A सीरिजचे पहिलेच IP68 सर्टिफाईड फोन आहेत. हे फोन वॉटर-डस्ट प्रूफ फोन आहेत. भारतातील फेस्टिव्ह सीजनमुळे कंपनीने ही सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.


एक नजर टाकूयात दोन्ही फोनच्या फिचर्सवर


गॅलक्सी A5 (२०१७) चे फीचर्स


  • ५.२ इंच आकाराची स्क्रीन

  • ३ GB रॅम

  • ३२ GB इंटर्नल स्टोरेज

  • १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा 

  • १६ मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही

  • फिंगरप्रिंट सेन्सर

  • ३०००mAh क्षमतेची बॅटरी

  • अँड्रॉईड ६.०.१६ मार्शमेलो सिस्टम


गॅलक्सी A7 (२०१७) चे फिचर्स


  • ५.५ इंच आकाराची एचडी स्क्रीन

  • ३ GB रॅम

  • १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा 

  • १६ मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही

  • ३३०० mAh क्षमतेची बॅटरी

  • अँड्रॉईड ६.०.१६ मार्शमेलो सिस्टम