नवी दिल्ली : सॅमसंगने (Samsung)काही दिवसांपूर्वी भारतात गॅलेक्सी Galaxy A80 लॉन्च केला होता. हा कंपनीचा पहिला रोटेटिंग कॅमेरा स्मार्टफोन आहे. या फोनचा रियल कॅमेरा रोटेट होऊन वर येतो आणि फ्रन्ट कॅमेरामध्ये बदलतो. हा स्मार्टफोन भारतात ४७ हजार ९९० रुपयांत लॉन्च झाला होता. आता Galaxy A80च्या किंमतीत कपात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील विक्रेते Mahesh Telecom यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंगने Galaxy A80 च्या किंमतीत ८ हजार रुपयांची कपात केली आहे. कपातीनंतर Galaxy A80ची किंमत ३९ हजार ९९० रुपये करण्यात आली आहे. 



Samsung Galaxy A80 वैशिष्ट्ये -


-स्लायडिंग रोटेटिंग कॅमेरा सेटअप (४८+८ मेगापिक्सल)
- ६.७० इंची एचडी डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३०G प्रोसेसर (Qualcomm Snapdragon 730G processor 
- ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज
- ३७०० mAh बॅटरी, 25W PD फास्ट चार्जिंग सपोर्ट
- Android 9 Pie
- डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर