मुंबई : सॅमसंग कंपनीने 'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो' हा नवा स्मार्टफोन लॉंन्च केला आहे. सध्या सॅमसंगने हा स्मार्टफोन दक्षिण कोरिया बाजारात आणला असून भारतीय बाजारात हा स्मार्टफोन कधीपर्यँत लॉंच होईल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो' हा 'सॅमसंग गॅलेक्सी ए-८ एस' सारखाच दिसतो पण हा फोन इनफिनिटी डिस्प्लेसह लॉंच केला आहे. सॅमसंगने हा स्मार्टफोन कोरियनमध्ये लॉंन्च करण्याआधी चीनमध्ये लॉंन्च केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत 'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो'ची वैशिष्ट्ये


- खास व्हिडिओ आणि गेम खेळणाऱ्यांसाठी स्मार्टफोनची निर्मिती 
- ६.४ इंच फूल व्ह्यू डिस्प्ले
- २३४०*१०८० पिक्सल डिस्प्ले
- ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट मेमरी
- ३४०० एमएएच बॅटरी
- जवळपास एक ते दीड दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅकअप
- फिंगरप्रिंट स्कॅनर
- क्वॉलकॉम स्पॅपड्रॅगन 
- लेटेस्ट मिडरेंज ७१० प्रोसेसर
- यूएसबी, टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रील आणि मायक्रोफोनची सुविधा


ट्रिपल कॅमेरा सेटअप


'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो'मध्ये तीन कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या रिअरसाठी ३ कॅमेरा सेटअप तर सेल्फीसाठी २४ मेगा पिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला २०१९च्या नवीन ट्रेंडनुसार पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. म्हणजेच फोनच्या फ्रन्टला एक होल असेल ज्यात सेल्फी कॅमेरा असणार आहे. या फोनचा कॅमेरा कलर आणि कॉन्ट्रास्ट या दोघांनाही स्वत:च ऑप्टीमाइज करू शकतो.


'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो' तीन रंगात उपलब्ध आहे. निळा, हिरवा आणि ग्रे या तीन रंगात मिळू शकतो. या फोनची भारतातील किंमत जवळपास ३७, ८०० रूपये इतकी आहे.