मुंबई: बजेटमधील फोन घेण्यासाठी आपण कायमच सर्च करत असतो. आपल्या बजेटमध्ये नेहमी चांगला आणि लेटेस्ट मॉडेल फोन घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा किंवा जुना फोन देऊन नवा घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Samsung कंपनीने M च्या यशस्वी सीरिजनंतर आता F सीरिजवर लक्ष केंद्रीत केलं आहे. खास ऑफर्स आणि जबरदस्त फीचर्स या मोबाईलमध्ये मिळणार आहेत. इतकच नाही तर बजेटमध्ये बसणारा हा फोन आहे. याशिवाय घसघशीत ऑफर्सही या फोनवर कंपनीकडून ई-कॉमर्स साईटवर देण्यात आल्या आहेत. 


कुठे मिळणार हा फोन आणि काय असेल किंमत?


F22 या फोनची विक्री 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता Flipkart आणि सॅमसंगच्या ऑनलाइन साइटवर होणार आहे. तिथे तुम्ही लॉगइन करून हा फोन खरेदी करू शकणार आहात. 6/64 मॉडेलची किंमत 12,499 तर 6/128 ची किंमत 14499 रुपये आहे. 


फोनवर मिळणार ही खास ऑफर


हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. निळा आणि काळा याशिवाय 13 जुलै रोजी खास 1 हजार रुपयापर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 12.499 रुपयांना मिळणारा फोन 11,499 रुपयांना मिळणार आहे. 


F22 चे काय आहेत स्पेसिफिकेशन्स


Samsung Galaxy F22 मध्ये 6.4 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. 1600 x 720 पिक्सल एचडी सुपर अॅम्युलेटेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. 256 gb पर्यंत मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी वाढवता येणार आहे. रियर पर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बॅटरीचा विचार करायचा तर  6000mAh आणि 15 व्हॅटचा चार्जर देण्यात आला आहे. 


कॅमेरा फीचर्स कोणते आहेत?


अपर्चर एफ/1.8 सोबत 48 मेगापिक्सल रेअर कॅमरा देण्यात आला आहे. त्यासोबत 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सल मायक्रो सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी अपर्चर एफ/2.0 सोबत 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.