मुंबई : जानेवारी महिन्यात सॅमसंग कंपनीने गॅलेक्सीची 'एम' सीरीज लॉन्च केली होती. गॅलक्सी 'एम १०' आणि गॅलेक्सी 'एम २०' या दोन्ही स्मार्टफोनला ग्राहकांनी जादा पसंती दिल्यानंतर 'सॅमसंग' कंपनी गॅलेक्सी 'एम ३०'च्या विक्रीला सुरुवात केली आहे.  भारतात सॅमसंगच्या स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असे. परंतु बाजारात दाखल झालेल्या अन्य कंपन्यांचे स्मार्टफोन सॅमसंगच्या तुलनेत अधिक स्वस्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अन्य कंपन्यांचे स्मार्टफोन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, हे कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी एम सीरीजची लॉन्चिंग केली. सॅमसंगचा 'एम ३०' हा स्मार्टफोन बाजारात आल्याने खळबळ उडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, ग्राहकांना मार्च महिन्यापासून 'एम ३०' स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


गॅलेक्सी 'एम ३०'ची वैशिष्ट्ये 



सॅमसंग गॅलेक्सी एम ३० मध्ये ३ रिअर कॅमेऱ्यांचा (१३+५+५) समावेश करण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा १६ मेगापिक्सल देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ६.३८ इंच आहे. 
या स्मार्टफोनची किंमत १५ हजारापासून सुरु होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये (४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोअरेज) आणि (६ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोअरेज) असे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. अमेझॉनवर ५ फेब्रुवारीला गॅलेक्सी एम १० आणि एम २० या दोन स्मार्टफोनची विक्री करण्यात आली होती. गॅलेक्सी 'एम १०' ची सुरुवातीची किंमत ७ हजार ९९० रुपये आहे. तर गॅलेक्सी 'एम २०' ची सुरुवातीची किंमत १० हजार ९९० रुपये आहे.