Samsung च्या Premium फोनवर 24 हजारांची घसघशीत सूट! पाहा ऑफर अन् Specifications
Samsung Phone Best Deals: हा फोन लॉन्च करण्यात आला तेव्हापेक्षा हा जवळजवळ अर्ध्या किंमतीला उपलब्ध होत आहे. या फोनवर देण्यात आलेली सूट आणि इतर वेगवेगळ्या ऑफरअंतर्गत मिळणारी सवलत पाहता एकूण 24 हजारांची सूट मिळत आहे.
Phone discount on Amazon: सध्या स्मार्टफोन बाजारापेठेमध्ये अगदी 7 हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे फोन उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार आणि गरजांनुसार ग्राहक यापैकी आवश्यक तो फोन निवडू शकतात. मात्र मागील काही काळापासून प्रीमियम फोनची मागणी वाढत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. असं असलं तरी अनेकजण परवडत नाही या एका कारणासाठी अनेकजण इच्छा असूनही प्रीमियम फोनऐवजी मिड रेंज किंवा एन्ट्री लेव्हलचे फोन विकत घेताना दिसतात. मात्र आता एन्ट्री किंवा मिड रेंज फोनच्या किंमतीत चांगला प्रीमियम फोन घेण्याची संधी ग्राहकांना चालून आली आहे.
कोणत्या फोनवर आहे सूट?
सध्याच्या घडीला जगभरातील स्मार्टफोन कंपन्यांपैकी आघाडीच्या कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या सॅमसंगने (Samsung) आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत फोनच्या किंमतीमध्ये कमालीची कपात केली आहे. विशेष म्हणजे ज्या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे तो एक फाइव्ह जी फोन आहे. या फोनचं नाव आहे 'गॅलेक्सी एस 21 एफई'! (Samsung Galaxy S21 FE 5G) हा फोन दिसायला फारच आकर्षक आहे. या फोनचा डिस्प्ले 6.4 इंचांचा असून हा फूल एचडी प्लस डायनॅमिक अल्मोड टू एक्स डिस्प्ले आहे. या फोनचा रिफ्रेश रेट हा 120 हर्ट्स आणि टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्स इतका आहे.
फोनचे फिचर्स कसे आहेत?
'गॅलेक्सी एस 21 एफई'मध्ये 5 एनएम ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अॅण्ड्रॉइड 12 बेस वन युआय 4 वर काम करतो. फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड प्रायमरी लेन्स, 12 मेगापिक्सल वाइड लेन्स आणि 8 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंगने या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. 25 वॅट चार्जिंगची सोय या फोनमध्ये आहे. या स्मार्टफोनला आयपी 68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंस रेटिंग देण्यात आली आहे.
किंमत किती?
या फोनची मूळ किंमत 55 हजारांपर्यंत आहे. मात्र विशेष सवलतीच्या दरामध्ये हा फोन सध्या उपलब्ध आहे. मागील वर्षी सॅमसंगने हा फोन बाजारात आणला होता. मागील वर्षी जानेवारीमध्ये या फोनची किंमत 54 हजार 999 इतकी होती. मात्र आता हा फोन 32 हजार 989 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनचं 8 जीबी/ 128 जीबी व्हेरिएंटवर तब्बल 22 हजार 10 रुपयांची सूट दिली जात आहे. ही सूट अॅमेझॉन या ऑनलाइन वेबसाईटवरील सेलमध्ये दिली जात आहे.
...तर 30 हजार 989 रुपयांना मिळेल फोन
या 22 हजारांच्या सवलतीबरोबरच बँक ऑफर्सच्या मदतीने गॅलेक्सी एस 21 एफईवर अधिक सूट मिळवता येईल. एचएसबीसीच्या क्रेडिट कार्डवर ईएमआयवर हा फोन घेतला तर 7.5 टक्के म्हणजेच जवळजवळ 2 हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ही ऑफर लागू झाली तर या फोनची किंमत 2 हजारांनी कमी होऊन हा फोन 30 हजार 989 रुपयांना मिळेल.
...तर 24 हजारांपर्यंत मिळेल सूट
एचएसबीसीबरोबरच अन्य 3 बँकांच्या कार्डावर ऑफर दिली जात आहे. एचडीएफसी बँक, यस बँक आणि इंडिसइंड बँकच्या कार्डवरही ऑफर दिली जात आहे. या कार्डवरील ऑफर्सचा विचार केला तर गॅलेक्सी एस 21 एफई फोनवर एकूण 24 हजारांपर्यंत सूट मिळवता येईल.