Samsung चं भन्नाट फिचर, आता फोनवर बोलण्याची गरजच नाही; तुमचा Smartphone च तुमच्या आवाजात देणार उत्तर
Samsung Calling Features: सॅमसंग (Samsung) आपल्या ग्राहकांसाठी असे अनेक फिचर्स (Features) देण्याचा प्रयत्न करत असतं, जे इतर दुसऱ्या Android फोनमध्ये मिळणार नाहीत. असंच एक Bixby Voice Assistant फिचर आहे. तसं तर Android फोनमध्ये Google Voice Assistant उपलब्ध आहे. पण सॅमसंग आपला वेगळा Voice Assistant देतो. हा Voice Assistant तुमच्यासाठी फोनवरही बोलू शकतो.
Samsung Calling Features: आर्टिफिशिल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI हे फिचर सध्या चांगलंच चर्चेत आहे. कोणाचं चित्र काढायचं असो किंवा मग बोलायचं असो, अशी सर्व कामं हे AI बॉट्स करत आहेत. आर्टिफिशिल इंटेलिजन्सला सर्ज इंजिनशी जोडलं जात आहे. अशात आता स्मार्टफोन निर्मातेही मागे राहू इच्छित नाहीत.
सॅमसंगने (Samsung) आर्टिफिशिल इंटेलिजन्सवर आधारित एका नव्या फिचरची घोषणा केली आहे. हे फिचर फारच कौतुकास्पद आहे. कंपनीने AI च्या एक पाऊल पुढे टाकत हे नवं फिचर लाँच केलं आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवाजाची नक्कल तयार करु शकता. हे फिचर फक्त तुमच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत नाही, तर फोनवर तुमच्या आवाजात संवादही साधतं.
आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या या वापरामुळे स्मार्टफोन आणखीन फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या सॅमसंगने हे फिचर सर्व विभाग आणि युजर्ससाठी लाँच केलेलं नाही. सध्या फक्त कोरियात हे फिचर वापरलं जाऊ शकत आहे.
कोणत्या युजर्सला मिळणार हे फिचर?
कोरियामध्ये सॅमसंगने आपलं वॉइस असिस्टंट Bixby ला या फिचरसह जोडलं आहे. Bixby वर टेक्स्ट कॉलचं एक फिचरही आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कॉलचं उत्तर मेसेज टाइप करुन देऊ शकता. म्हणजेच, जर तुम्हाला त्या घडीला बोलणं शक्य नसेल तर आपला मेसेज टाइप करा आणि Bixby हा मेसेज वाचून समोरील व्यक्तीला सांगेल.
आता हे फिचर वापरणाऱ्यांना चांगली सुविधा मिळणार आहे. कारण कंपनी याला AI शी जोडत आहे. गुगलच्या एका घोषणेनंतर सॅमसंगने या फिचरची घोषणा केली. गुगलने आपल्या वॉइस असिस्टंट म्हणजेच Google Assistant चा वापर फोन कॉलिंग ऑटो करण्यासाठी करत आहे.
सॅमसंगचं हे नवं फिचर कोणताही AI Clone नाही, जो तुमचा आवाज काढत आपोआप लोकांशी संवाद साधेल. हे फिचर तुमच्या कमांडवरच काम करणार आहे.
सॅमसंगचं हे नवं फिचर कसं काम करणार?
सॅमसंग Bixby Custom Voice Creator च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवाजातील काही गोष्टी रेकॉर्ड करुन ठेवू शकतात. याचा वापर तुम्ही एखाद्या कॉलचं उत्तर देताना करु शकता. सॅमसंग या फिचरला Bixby Text Call प्रमाणे सादर करत आहे. आगामी दिवसात AI आधारित हे फिचर सॅमसंगच्या दुसऱ्या Apps मध्येही असेल असं कंपनीने सांगितलं आहे.