नवी दिल्ली : दक्षिण कोरियन टेक्नोलॉजी कंपनी सॅसंगने भारतीय बाजारात आपला नवा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगने लॉन्च केलेल्या Galaxy J4 या स्मार्टफोनमध्ये असे काही फिचर्स आहेत जे इतर कंपन्यांच्या बजेट फोन्सपेक्षा खूप वेगळे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Galaxy J4 या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाचा एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. Exynos 7570 प्रोसेसर देण्यात आला असून हा क्वॉडकोअर आहे. यामध्ये तुम्हाला 2GB रॅम मिळणार आहे. तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 3GB रॅम देण्यात आला आहे. इंटरनल मेमरी क्रमश: 16GB आणि 32GB आहे. अॅस्पेक्ट रेश्योचा विचार करता Galaxy J4 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 16:9 अॅस्पेक्ट रेश्यो मिळणार आहे. 


फोटोग्राफीसाठी Galaxy J4 या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यामातून तुम्ही फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करु शकता. सेल्फीसाठी या फोनमध्ये एचडी फ्लॅश सोबतच 5 मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 3000 mAh असून कंपनीने दावा केला आहे की ही बॅटरी 20 तासांचा बॅकअप देऊ शकते.


मेक इन इंडिया


सॅमसंगच्या मते, हा स्मार्टफोन मेक इन इंडिया अंतर्गत बनवला आहे. या फोनमध्ये अॅडव्हान्स मेमरी मॅनेजमेंट देण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियाचे व्हिडिओज आणि ईमेजेस थेट मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करु शकतात. यासोबतच या डिव्हाईसच्या माध्मयातून तुम्ही सोशल मीडिया मॅसेंजरवर आलेले फोटोजही डिलीट करु शकता जे एकसारखे असतात आणि अनेकदा डाऊनलोड होतात. 


अॅप पेअर फिचर


Galaxy J4 या स्मार्टफोनमध्ये अॅप पेअर फिचर देण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून एका अॅप सोबतच दुसरं अॅप ओपन करण्यासाठी तुम्ही पेअर करु शकता. त्यामुळे एकावेळेस दोन अॅप सुरु करता येतील. 


Galaxy J4 फोनची किंमत


Galaxy J4 या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 9,990 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 2GB रॅमसोबतच 16GB ची इंटरनल मेमरी मिळणार आहे. तर, दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 3GB रॅम 32GB मेमरीसह असलेल्या फोनची किंमत 11,990 रुपये आहे.