अन् २०० प्रवाशांना मोफत दिला Galaxy Note 8 फोन
अॅपल पाठोपाठ अलिशान फोनची निर्मिती करणार्या सॅमसंगने सुमारे २०० प्रवाशांना Galaxy Note 8 हा फोन भेट म्हणून मोफत दिला आहे.
स्पेन : अॅपल पाठोपाठ अलिशान फोनची निर्मिती करणार्या सॅमसंगने सुमारे २०० प्रवाशांना Galaxy Note 8 हा फोन भेट म्हणून मोफत दिला आहे.
भारतामध्ये सुमारे ६७,००० रूपयांमध्ये उपलब्ध असलेला हा समार्टफोन मोफत मिळाल्याने प्रवासी आनंदले होते.
आईबेरिया एयरलाइन फ्लाइट संख्या IB 0513 यामध्ये अचानक २०० प्रवाशांना Galaxy Note 8 गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला. सॅमसंग स्पेनने आईबेरिया एअरलाईंसमध्ये गिव्ह अवे ही योजना आखली होती. या प्रोग्राम अंतर्गत डोमेस्टिक फ्लाईटमध्ये नोट 8 प्रवासांना दिला. त्यानंतर सुखावलेल्या प्रवाशांनीदेखील सेल्फी, व्हिडिओ काढून सोशल मीडीयामध्ये हे खास क्षण शेअर केले आहेत.
गेल्यावर्षी Galaxy Note 7 लॉन्च करण्यात आला होता. मात्र त्यानंतर फोनची बॅटरी फुटण्याच्या सलग घटना समोर आल्यानंतर सॅमसंगने Galaxy Note 7 ची निर्मिती बंद केली होती.
यंदा सॅमसंगने Galaxy Note 8 लॉन्च केला आहे. कंपनीच्या वाईट काळामध्येही ग्राहकांनी कंपनीला साथ दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी प्रवाशांना भेट म्हणून फोन मोफत दिल्याचे कंपनीने सांगितले आहे. Galaxy Note 7 सदोष असल्याने कंपनीने ग्राहकांची माफीदेखील मागितली होती.