मुंबई : सॅमसंगने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा नवा फोन Samsung Galaxy J2 (2018) थेट Redmi 5 ला जबरदस्त टक्कर देणार आहे. याची किंमत कमी असल्याने या नवा फोन बाजारात अत्यंत लोकप्रिय होत आहे. Galaxy J2 काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या Galaxy J2 Pro सारखाच आहे. हा फोन खरेदी केल्यवर रिलायन्स जिओकडून बंपर ऑफर सादर केली जात आहे. रिलायंस जिओकडून 2750 रुपयांचा इंस्टेंट कॅशबॅक ऑफर मिळत आहे. यासाठी तुम्हाला माय जिओ अॅपवरुन 198 किंवा 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. Jio सब्सक्राइबरला प्रत्येक महिन्याला अतिरिक्त 10 GB 4G डेटा दिला जाईल. ही सुविधा ग्राहकांना पुढील १० रिचार्जवर लागू असेल. Galaxy J2 (2018) ची भारतीय बाजारात किंमत 8,190 रुपये आहे. ब्लॅक, गोल्ड आणि पिंक कलरमध्ये हे फोन उपलब्ध आहेत. याची विक्री २७ एप्रिलपासून सुरू होईल. रिलायंस जिओकडून कॅशबॅक ऑफर मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त 5440 रुपयांना मिळेल. पहा नव्या स्मार्टफोनचे फिचर्स...


डिस्प्ले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Samsung Galaxy J2 (2018) मध्ये 5 इंच क्यूएचडीचा  540 x 960 पिक्सल रिजोलूशन असलेला सुपर एम्लोईड डिस्प्ले आहे. पॉलीकार्बोनेट बॉडी देण्यात आली आहे. 8.4 एमएम जाडी असलेल्या नव्या फोनमध्ये  1.4 गीगा हर्टजचा क्वाड-कोर स्नॅपड्रेगन प्रोसेसर आहे.


रॅम आणि इंटरनल मेमरी


Samsung Galaxy J2 मध्ये 2 GB रॅम आहे. यात 16 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आाल आहे. गरज असल्यास मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत मेमरी वाढवण्यात येईल. या बजेटमध्ये 256 GB एक्सपेंडेबल मेमरीचा प्रयोग करण्यात आला आहे. 



कॅमेरा


Samsung Galaxy J2 (2018) मध्ये 8 MP चा ऑटोफोकस रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 5 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्हीही कॅमेऱ्यात एलईडी फ्लॅश सपोर्ट करेल.


बॅटरी


स्मार्टफोनमध्ये 2600 mAh ची बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनचा १८ तासांचा टॉक टाईम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G वीओएलटीई, वायफाय, ब्लूटुथ 4.2, जीपीएस, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि मायक्रो यूएसबी 2.0 देण्यात येईल.