Gas Room Heater: सध्या सर्वांना थंडीची चाहूल लागलीय. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झालीय. हिवाळ्यात फार त्रास होऊ नये म्हणून अनेक जण घरात एकासोबत अनेक हीटर लावतात. हे हीटर वीजेवर चालतात. मात्र घर मोठं असल्यावर जास्त हीटरची गरजे लागते. परिणामी वीज बीलही जास्त येतं. तुमचं कुटुंबही मोठं असेल आणि वीज बिल कमी हवं असेल, तर तुम्हाला एका भन्नाट हीटर घेऊन आलो आहोत.  विशेष म्हणजे हा हीटर चालवण्यासाठी विजेची गरज लागणार नाही. यामुळे वीज असो वा नसो हीटर मात्र आपलं काम करतच राहिल. (save power and use smart flame gas cabinet lpg heater know price and details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही ज्या हीटरबाबत सांगत आहोत तो वीजेवर नाही तर गॅसवर चालणार आहे. हा हीटर ऑनलाईन इ कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करता येईल. Smart flame gas cabinet LPG heater असं या हीटरचं नाव आहे.  हा हीटर आकाराने खूप मोठा आहे. या हीटर वापरण्यासाठी छोटा गॅसचा वापर करावा लागेल. हा हीटर संपूर्ण घरात उष्णता निर्माण करतो. विशेष म्हणजे कोणत्याही विजेशिवाय आणि निम्म्या खर्चात आपलीही गरज भागते.   
 
अनेक शहरात विजेच दर भरमसाठ आहेत. त्यामुळे विजेवर हीटर वापरण्याआधी दहावेळा विचार करावा लागतो. अशा वेळेस हा हीटर शंभर टक्के उपयोगी पडेल. 


नक्की किंमत किती?


या हीटरची किंमत 8 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र  या हीटरवर 11 टक्के सूट आहे. त्यामुळे हा हीटर 7 हजार 991 रुपयात खरेदी करता येईल. हा हीटर इनडोर आणि आऊटडोर दोन्ही पद्धतीने उत्तमरित्या काम करतो.