एका SMS किंवा कॉल तुमचं अकाऊंट रिकामं करू शकतो...SBI कडून अलर्ट जारी
तुमची एक चूक तुमचं खात रिकामं करू शकते त्यामुळे SBI ने अलर्ट जारी केला आहे.
मुंबई: लॉकाडाऊन काळात ऑनलाइन खरेदी आणि विक्री करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याच प्रमाणे घोटाळे आणि सायबर क्राइमचे प्रकारही वाढले आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळ्याचे प्रकार समोर येत आहेत. ऑनलाइन आर्थिक फसवणूकीची अनेक प्रकरणे चर्चेत येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने
आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तुमची एक चूक तुमचं खात रिकामं करू शकते त्यामुळे SBI ने अलर्ट जारी केला आहे. आपली एक छोटीशी चूक तुमचे बँक बॅलन्स रिकामं करू शकते. एसबीआयने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. बँक
खात्यातून अनधिकृत व्यवहाराची वाढती प्रकरणे लक्षात घेता बँकेने ग्राहकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. SBI वारंवार आपल्या ट्विटरवर याबाबत जनजागृती करत आहे.
अनोळखी नंबरवरून फोन आल्यास त्यावर तुमची कोणतीही खासगी बँकेचे डिटेल्स असणारी माहिती SMS द्वारे किंवा फोनद्वारेही शेअर करू नका. याशिवाय अशा नंबरची तक्रार तातडीनं सायबर क्राइमकडे करण्याचा सल्ला दिला आहे.
ऑनलाइन फसवणूक होऊ नये म्हणून या गोष्टी करा
आपला OTP किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नका
बँकेचे अधिकारी कधीही तुम्हाला पासवर्ड किंवा युझर आयडी मागण्यासाठी फोन करत नाहीत. त्यामुळे सावध राहा
आपला पॅन नंबर, आधार कार्ड नंबर आणि खात्याची कोणतीही माहिती कोणत्याही सोशल मीडियावरून कोणालाही शेअर करू नका याशिवाय कोणालाही सांगू नका
तुम्ही वॅक्सिन घेतलं असेल तर त्याचे डिटेल्स असणारे फोटोही शेअर करू नका त्यामुळेही नुकसान होऊ शकतं