मुंबई: तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल आणि तुम्ही कार्ड वापर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे 1 डिसेंबरपासून कार्ड संदर्भातील नियम बदलणार असून तुमच्या खिशाला आता चांगलीच कात्री लागणार आहे. SBI बँकेनं आपल्या कार्डसाठीचे केलेले बदल जाहीर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. आधी ही बातमी वाचा. याचं कारण म्हणजे क्रेडिट कार्ड घेणं आता तुम्हाला महागात पडू शकतं. SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या EMI व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील.


SBI कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने याबाबत माहिती दिली आहे. SBI क्रेडिट कार्डमध्ये EMI व्यवहारासाठी आता 99 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. हा एक प्रकारचा करच असणार आहे. जो आपल्याला भरावा लागेल. 1 डिसेंबरपासून हा नवा नियम लागू होत आहे. 


ई कॉमर्स किंवा शॉपिंग साइटवर म्हणजे  अमेझॉन किंवा फ्लिपकार्डवर बऱ्याचदा EMI शॉपिंग करण्यात येतं. एकदम खिशाला कात्री नको म्हणून EMI पर्याय निवडला जातो. मात्र आता इथेही 99 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहेत. 99 रुपये प्रोसेसिंग फी असणार आहे. 1 डिसेंबरपासून 99 रुपये क्रेडिटकार्ड असलेल्यांना भरावे लागणार आहेत. 


1 डिसेंबरआधी ग्राहकांना मात्र EMI वर कोणतेही पैसे न आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं नाही किंवा प्रोसेस झालं नाही तर तुम्हाला 99 रुपये परत मिळू शकतात अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.