मुंबई : जगातील नामांकित भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (ISRO) सोबत काम करण्याची संधी तुम्हाला चालून आली आहे. ही एक सुवर्ण संधी आहे. इसरोने शास्त्रज्ञ आणि अभियंता या पदासाठी सरकारी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. जर या पदांसाठी असणारी योग्यता तुमच्याकडे आहे, तर तुम्ही आपला अर्ज 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दाखल करू शकता, तो देखील ऑनलाईन.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीनंतर करण्यात येईल. याच्याशी संबंधित शैक्षणिक अर्हता तसेच इतर गोष्टींची माहिती खाली वाचा.


पदाचं नाव - शास्त्रज्ञ/अभियंता
पद का नाम - साइंटिस्ट/इंजीनियर
एकूण खाली जागा - 327
वर्योमर्यादा  - 35 वर्ष
योग्यता - B.E./B.Tech
वेतन - 56100/- रुपये (लेव्हल-10)
नोकरीचं शहर - बेंगलुरु, कर्नाटक


ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे
https://apps.isac.gov.in/CentralBE-2019/advt.jsp


परीक्षा फी
या पदासाठी अर्ज दाखल करणारे, ओबीसी आणि जनरल कॅटेगरीतील उमेदवारांना 100 रूपये फी आहे. तसेच ही फी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून देऊ शकता. महिला उमेदवार, एससी-एसटी, पीडब्लूडी कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणतीही फी भरण्याची गरज नाही.


महत्वाचे
ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरूवात- 15 अक्टूबर 2019 से 
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 04 नवंबर 2019
फीचे पैसे भरण्याची शेवटची तारीख  - 06 नवंबर 2019.