मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पाऊस दाखल झालाय... अशा वेळी तुम्हाला अर्थातच बाईकवरून किंवा स्कुटीवरून प्रवास कसा करावा? असा साहजिकच प्रश्न पडला असेल. पण, तुमच्या या प्रश्नावरदेखील सध्या बाजारात उत्तर उपलब्ध आहे. बाईक किंवा स्कुटरवरून जात असताना पाऊसात भिजू नये, याची काळजी घेणारं एक प्लास्टिकचं छप्पर सध्या मार्केटमध्ये सहजच उपलब्ध आहे. 


बाईक/स्कुटरचा रेनकोट

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण पावसात भिजू नये म्हणून जसं रेनकोट वापरतो तसाच रेनकोट बाईक / स्कुटरसाठी उपलब्ध आहे. या प्लास्टिक कीटमुळे बाईक चालवणाऱ्या व्यक्तीसोबत बाईक मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीही पावसात भिजण्यापासून सहजच वाचू शकतो. यांना 'सन रुफ कव्हर' म्हणूनही ओळखलं जातं. हे कव्हर संपूर्णत: वॉटरप्रुफ असतं. 


हे कव्हर सहजच बाईक किंवा स्कुटरवर इन्स्टॉल केलं जाऊ शकतं. यामध्ये मागच्या आणि पुढच्या बाजुला ट्रान्सपरन्ट पॉलिथिन असतं... तर वरच्या बाजुला पॅराशूट कपडा असतो. बाईकच्या हॅन्डलपासून ते मागच्या सीटपर्यंत हे कव्हर लावता येतं. त्यामुळे पावसात भिजण्यापासून वाचता येऊ शकतं... आणि हे कव्हर सहजच बाजुला काढूनही ठेवता येतं. महत्त्वाचं म्हणजे, या प्लास्टिक कीटसाठी तुम्हाला जास्त पैसेही मोजावे लागणार नाहीत. अगदी हजार रुपयांच्या आत हे कव्हर उपलब्ध होऊ शकेल.