WhatsApp वर ग्रुप न बनवता 250 लोकांना पाठवा नवीन वर्षाच्या शुभेच्छा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना संदेश पाठवू शकता.
मुंबई : आज सगळे नवीन वर्षाच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वरून लोकं आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ लागले आहेत. परंतु आपल्याला हे माहित आहे की, व्हॉट्सअॅपवर एकाच वेळी पाच जणांनाच मेसेज पाठवता येतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एकाच वेळी व्हॉट्सअॅपवर अनेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर त्यासाठीही एक मार्ग आहे. यासाठी तुम्हाला ग्रुप तयार करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी 250 लोकांना मेसेज पाठवू शकता.
यासाठी व्हॉट्सअॅपवर सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे. याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी शेकडो लोकांना संदेश पाठवू शकता. यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी सर्व कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करण्याची गरज नाही.
या फीचरसह, जर तुमचा संपर्क क्रमांक रिसीव्हरच्या फोनमध्ये सेव्ह केला असेल, तर त्यांना तुमचा संदेश सामान्य खाजगी चॅटप्रमाणे मिळेल. जर त्यांनी मेसेजला रिप्लाय दिला तर तुम्हाला तेही मिळेल.
व्हॉट्सअॅपवर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करुन वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन व्हर्टिकल डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला ज्याला संदेश पाठवायचा आहे तो संपर्क निवडा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ब्रॉडकास्ट सूची उघडा आणि तुमचा संदेश टाइप करा आणि पाठवा चिन्हावर क्लिक करा. हा खाजगी संदेश तुमच्या जोडलेल्या सर्व संपर्कांपर्यंत पोहोचेल.