`शशी थरूर` म्हणाले, मी आहे रे `शशी कपूर` गेले!
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं, पहिल्या नावात साधर्म्य असल्याने शशी थरूर यांच्या नावाबद्दल गैरसमज झाला, तेव्हा शशी थरूर यांनी
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं, पहिल्या नावात साधर्म्य असल्याने शशी थरूर यांच्या नावाबद्दल गैरसमज झाला.
थरूर यांच्या कार्यालयात फोन
तेव्हा शशी थरूर यांनी ट्ववीट करून सांगितलं, ही बातमी चुकीची आहे. ती शशी कपूर यांची बातमी आहे. कारण शशी थरूर यांच्या कार्यालयात शशी थरूर यांना श्रद्धांजलीचे फोन येत होते.
अभिनेते शशी कपूर यांचं निधन झाल्याची बातमी आल्यानंतर. ट्ववीटरवर शशी थरूर हे अनेकवेळा ट्रोल होत असतात, यावेळी त्यांना असं स्पष्टीकरण देण्याचीही वेळ आली.
बॉलीवूडमधील काही ट्वीटस
सिनेमातील शशी कपूर यांचं उल्लेखनीय योगदाव नेहमीच आठवणीत असेल- अक्षय कुमार
शशी कपूर यांना विसरता येणार नाही - अजय देवगन
'मेरे पास मां है'
क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने, 'मेरे पास मां है' या त्यांचा प्रसिद्ध डॉयलॉग लिहून श्रद्धांजली दिली आहे, तर येणाऱ्या पिढ्यांना ते प्रेरीत करत राहतील.