नवी दिल्ली : स्कोडा या लोकप्रिय कार कंपनीने त्यांच्या ७ सीटर कोडियाक एसयूव्ही ही कार भारतात लॉन्च केली. भारतात या कारचं डिझल इंजिन लॉन्च करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कार चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होणार असून कारची डिलेव्हरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होणार आहे. या कारची भारतातील किंमत ३४.४९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आलीये. 


कंपनीने दावा केलाय की, भारतात लॉन्च झालेल्या Skoda Kodiaq चा मायलेज १६.२५ किलोमीटर प्रति लीटर इतका आहे. ग्लोबली या एसयूव्हीला १९ इंच अलॉय व्हील्ससोबत विकले जात आहे. तर भारतातील या स्कोडा कोडियाक ही कार १८ इंच अलॉय व्हील्ससोबत लॉन्च करण्यात आली आहे. 


ही स्कोडाची पहिली ७ सीटर एसयूव्ही कार आहे, जी फोक्सवॅगन ग्रुपच्या ग्लोबल एमक्यूबी लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर आऊडी क्यू ७ आणि पोर्श काएस या कारही तयार करण्यात आल्या आहेत. याआधी १८ महिन्यांपूर्वी स्कोडाने सुपर्ब सिडॅन कार लॉन्च केली होती.


या एसयूव्हीमध्ये स्कोडाने पेडल स्वाईप ओपन टेल गेट, अम्ब्रेला होल्डर्स, रिमूव्हेबल टॉर्च इत्यादी फिचर्स दिले आहेत. यात ८ इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टमही देण्यात आलीये. हे अ‍ॅपल कार प्ले, गुगल अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो आणि मिरर लिंकला सपोर्ट करतं. 


Kodiaq मध्ये १९६८ सीसीचं ४ सिलेंडर टर्बो डिझल मोटर लावण्यात आली आहे. ही मोटर १५० हॉर्सपावरची शक्ती आणि ३४० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यात ७ स्पीड ड्य़ूअल क्लच ऑटोमॅटीक ट्रान्समिशन सिस्टम दिलं गेलंय.