Smart Tips To Clean Smartphone: स्मार्टफोन साफ आणि स्वच्च ठेवणं फार महत्त्वाचं असतं कारण स्मार्टफोनचा थेट संपर्क आपल्या शरीराशी येतो. अनेकजण स्मार्टफोन साफ करायचा म्हणजे त्याची स्क्रीन पुसून काढण्यापासून कापडाने तो पुसण्यापर्यंच्या अनेक गोष्टी करतात. मात्र अशाप्रकारे कापडाने किंवा कोणत्याही गोष्टीने घासून स्मार्टफोन साफ करताना त्याला स्क्रॅच पडण्याची आणि स्मार्टफोनची स्क्रीन खराब होण्याची शक्यात असते. अशापद्धतीने तुम्हीही स्मार्टफोन साफ करत असाल तर वेळीच हे बंद करा. चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन साफ केल्यास तो कायमचा खराब होऊ शकतो. 


नेमका कसा साफ करावा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाटेल तशापद्धतीने घासून-पुसून फोन साफ केल्यास त्याचा लाइफस्पॅन कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच फोन लवकर खराब होण्याची शक्यता अधिक वाढते. अशापद्धतीने वरवर अगदी किरकोळ वाटणारं डॅमेज फार खर्चिक ठरु शकतं. अशा किरकोळ कारणांनी खराब झालेला फोन दुरुस्त करण्यासाठी खिसा चांगलाच हलका करावा लागू शकतो. आता फोन घासून साफ नाही करायचा तर स्मार्टफोन नेमका कसा साफ करावा अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र यासाठी फार गोंधळून जाण्याची गरज नाही. स्मार्टफोन साफ करण्याच्या काही फार सोप्या पद्धती आहेत. ज्यांचा वापर करुन स्मार्टफोन अगदी छान पद्धतीने साफ करता येतो. या पद्धती कोणत्या पाहूयात...


> स्मार्टफोन साफ करण्याआधी तो स्विच ऑफ करावा. स्मार्टफोन साफ करण्यासाठी नुसतं ओलं कापड वापरणं टाळावं. तसेच सामान्य लिक्वीड क्लीनरऐवजी अल्कोहोल बेस लिक्वीड क्लीनर वापरणं अधिक फायद्याचं ठरतं. 


> अल्कोहोल बेस लिक्वीडने स्मार्टफोन साफ केल्यास तो स्वच्छ तर होतोच पण पुढे बराच काळ तो जंतूंपासून सुरक्षित राहतो.


> स्मार्टफोनवरील धूळ साफ करण्यासाठी सामान्य कापड वापरणं टाळावं. सामान्य कापडाऐवजी मायक्रो फायबरपासून बनवलेलं कापड वापरणं अधिक योग्य ठरतं. मायक्रो फायबरने स्मार्टफोनची स्क्रीन साफ केल्यास फोनचा डिस्प्ले खराब होत नाही. 


> स्मार्टफोनच्या ऑडिओ जॅक, चार्जिंग पॉइण्ट किंवा स्पीकर्स ग्रिलसारख्या छिद्र असलेल्या जागा साफ करायच्या असल्या तर अनेकजण टोकदार वस्तूंचा वापर करतात. मात्र अशापद्धतीने टोकदार वस्तूंनी स्मार्टफोन साफ केल्यास संवेदनशील भागांना फटका बसू शकतो.


> त्यामुळे स्मार्टफोन साफ करताना तो टोकदार वस्तूंमुळे खराब झाल्यास स्मार्टफोनचा संपूर्ण भागच म्हणजे ऑडिओ जॅक, चार्जिंग पॉइण्ट किंवा स्पीकर्स बदलावा लागू शकतो. त्यामुळे टोकदार वस्तूंचा वापर स्मार्टफोन साफ करण्यासाठी करु नये.


> ऑडिओ जॅक, चार्जिंग पॉइण्ट किंवा स्पीकर्स ग्रिल साफ करण्यासाठी धातूच्या वस्तूंऐवजी एअरबड्सचा किंवा टूथपिकचा वापर करावा.