नवी दिल्ली : देशातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीने डिटेल मोबाईलल्स अंण्ड एसेसरीजने आपला स्मार्ट एलईटी टी.व्ही. बाजारात लॉन्च केला. गुगलच्या अॅनरॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा टी.व्ही. अत्यंत स्वस्त आहे. ३२ इंचाचा हा स्मार्ट टी.व्ही. बी२बी अड्डा डॉट कॉमवर फक्त १७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. कंपनीने आपले दोन एलईडी टी.व्ही. देखील बाजारात लॉन्च केले आहेत. २४ इंचाच्या या एलईडी टी.व्ही.ची किंमत ९,९९९ रुपये आणि ३२ इंचाच्या या एलईडी टी.व्ही.ची किंमत १३,९९९ रुपये आहे.


भारतात वाढतोय टी.व्ही.चा बाजार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच सादर केलेल्या रिपोर्टनुसार, भारतात टी.व्ही.चा बाजार २०२१ पर्यंत ९ अरब डॉलर पेक्षा अधिक कमाई करेल. हा स्मार्ट टी.व्ही. प्रिमियम कॅटगरीत सामिल झाला आहे. ज्याची बाजारत एकूण विक्री भागीदारी १५% पेक्षा कमी आहे.


नव्या सफरीची सुरूवात


एसजी कॉपोरेट मोबिलिटीचे प्रबंध निर्देशक योगेश भाटिया यांनी सांगितले की, स्मार्ट इंडियात स्मार्ट टी.व्ही. सादर करून एका नव्या सफरीला सुरूवात केली आहे.
भाटीया यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीचे स्वस्त मॉडेल्स सादर करुन देशातील लाखो लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा मानस आहे. कंपनीने या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात २४ इंच ते ६४ इंचापर्यंत एलईडी टी.व्ही. सादर करण्याची योजना आहे.