नवी दिल्ली : चीनची नामांकीत टेक कंपनी हुवेई चा सब ब्रॅण्ड असलेला ऑनर या कंपनीने भारतीय बाजारात हॉली 4 प्लस (honor holly 4 plus)  स्मार्टफोन  केला. या फोनची बॅटरी 4000 mAh असून 8 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन सर्व ऑनर स्टोरमध्ये ३ नोव्हेंबरपासून गोल्डन आणि सिल्वर कलर मध्ये उपलब्ध होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हुवेई उपभोक्ता व्यापार समूह भारताचे उपाध्यक्ष पी. संजीव यांनी सांगितले की, "हा फोन भारताची विविधता लक्षात घेऊन बनवला आहे. ग्राहकांना चांगली सुविधा देणे हाच या मागचा उद्देश आहे."


honor holly 4 plus हा नवा स्मार्टफोन ८.२ एमएम आणि मेटल फिनिशिंग असलेला आहे. यात रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. फोनमध्ये २.५ डी ग्लासचा एचडी डिस्पले असून ईएमयूआई ५.१ आहे. 
अॅनरॉईड 7.0 में क्वालकॉम स्नेपड्रेगन 435 ऑक्टा कोर 64 बिट प्रोसेसर वर हा फोन चालतो. 


फोनमध्ये 3 GB रॅम आणि इंटरनल स्टोरेज 32 GB आहे. जे वाढून तुम्ही  128 GB पर्यंत करू शकता. हॉली 4 प्लस मधून कमी प्रकाशात देखील फोटो काढता येतील. कारण यात 12MP रियर कॅमेऱ्यासोबत 1.25 माईक्रोमीटर सेंसर लावले आहे. 8 MP फ्रंट कॅमेऱ्यात  ब्यूटी मोड हा ऑप्शन आहे. त्यामुळे युजर्स 0.3  सेकंदच्या स्पीड फोकसने फोटो काढू शकतात.