Mobile Phones Offers : गेल्या काही वर्षात ऑनलाईन शॉपिंगकडे (online shopping) लोकांचा कल वाढला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघता ई-कॉमर्स वेबसाईटवर रोजच्या गरजेच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रिक गॅजेट्स, औषध, अन्नधान्य, कॉस्मेटिक्स, मोबाईल आदी गोष्टी उपलब्ध करुन देत आहेत. तुम्ही जर ऑनलाईन मोबाईल खरेदी करण्याचे नियोजन करत असाल  तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये फ्लिपकार्टने Realme स्मार्टफोन्सच्या (smartphone) खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे. जर तुमचे बजेट खूपच कमी असेल आणि तरीही तुम्हाला प्रीमियम दर्जाचा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी असा दमदार स्मार्टफोन घेऊ शकता. ज्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देण्यात आली आहे. जर तुम्हीही हा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या डिटेल्स.... 


वाचा: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात? 


Realme 9 (Stargaze White, 128 GB) (6 GB RAM) व्हेरिएंट हा एकमेव स्मार्टफोन ज्याच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 20999 रुपये आहे. परंतु Flipkart वर 19% ची सूट दिली जात आहे. त्यामुळे त्याची किंमत 16999 रुपयांवर आहे. पण Realme 9 स्मार्टफोनची सूचीबद्ध किंमत 16999 रुपये आहे. या किंमतीवर सूट मिळू शकते कारण Flipkart स्मार्टफोनच्या खरेदीवर 16100 रुपयांच्या एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे. हा एक्सचेंज बोनस मिळविण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या स्थितीचा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे आणि जर सर्वकाही व्यवस्थित झाले तर तुम्हाला हा एक्सचेंज बोनस मिळू शकेल आणि त्यानंतर स्मार्टफोनच्या किंमतीतून 16100 वजा केले जातील. त्यानंतर तुम्हाला फक्त 899 रुपये मिळतील.