Things to Do if Your Phone Is Stolen: आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईल फोन ही फार महत्त्वाची गोष्ट झाली आहे. तसं स्मार्टफोन ही सध्या अत्यावश्यक गोष्ट झाली आहे, खास करुन मेट्रो शहरांमध्ये स्मार्टफोन ही मस्ट हॅव गोष्ट आहे. स्मार्टफोन नसेल तर तुम्ही धावत्या जगापासून डिसकनेक्टेड होता. स्मार्टफोनमध्ये अगदी फोटो काढण्यापासून तो ऑनलाइन व्यवहारांपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. अगदी बँकांचे व्यवहारही स्मार्टफोनवरुनच होतात. मात्र एवढा महत्त्वाचा स्मार्टफोन चोरीला गेला तर काय करुन आणि काय नको असं होतं.


...तर तोच आणून देईल तुम्हाला फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलमधील डेटा चोरीला जाण्याची भीती तर असतेच शिवाय पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मोबाईल सापडेलच याची शाश्वती नसते. मात्र मोबाईल फोन हरवल्यानंतर आता घाबरुन जाण्याचं आणि वैतागण्याचं कारण नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने मोबाईल हरवल्यानंतर नेमकं काय करता येईल याबद्दलची माहिती दिली आहे. या पोलिस अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार मोबाईल हरवल्यानंतर काही गोष्टी केल्या तर चोर स्वत: तुम्हाला मोबाईल आणून देईल.


घाबरुन न जाता हे करा


आयपीएस अधिकारी असलेल्या अशोक कुमार यांनी ट्विटरवरुन मोबाईल हरवल्यानंतर नेमकं काय करावं याबद्दलची माहिती दिली आहे. 'माझा फोन हरवला आहे. (अशी स्थिती असेल तर) सर्वात आणि घाबरुन जाऊ नका. तुमच्याकडे फार वेळ नसेल आणि तुम्ही एकदा मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांकडे वारंवार जाणं शक्य नसेल तर ही माहिती तुम्हाला फारच उपयोगात येईल,' असं अशोक यांनी म्हटलं आहे. अशोक यांनी एका वेबसाईटची लिंक शेअर केली आहे. "मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपली तक्रार नोंदवा. इथे तक्रार नोंदवल्यानंतर चोर तुमच्या मोबाईलचा उपयोग करु शकणार नाही आणि त्याला तुम्हाला तुमचा मोबाईल परत करावाच लागेल," असं अशोक यांनी पुढे म्हटलं आहे. या ट्वीटबरोबर त्यांनी एक छोटा व्हिडीओही पोस्ट केला आहे.



काय आहे व्हिडीओमध्ये?


अशोक यांनी शेअर केलेला व्हिडीओ 45 सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये चोरीला गेलेला फोन म्हणजेच मोबाईल डिव्हास कसं ब्लॉक करावं याबद्दलची माहिती दिली आहे. सर्वात आधी तुम्हाला यासाठी मोबाईलचं बिल, फोन हरवल्याच्या तक्रारीची एफआयआर आणि मोबाईलचा आयएमईआय क्रमांक लागेल. त्यानंतर सीईआयआरच्या वेबसाईटवर जाऊन मोबाईल ब्लॉक करण्याचा पर्याय निवडावा. त्यानंतर समोर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी. योग्य ते पर्याय निवडावेत आणि फॉर्म सबमीट करावा. यानंतर पुढील काम पोलिस आणि सर्व्हिलन्स टीमचं असतं. मात्र इथे फॉर्म सबमीट केल्यानंतर डिव्हाइज ब्लॉक होईल. त्यामुळे हा फोन ज्याच्याकडे आहे त्याने सीम कार्ड बदलून दुसरं टाकलं तरी त्याला तो वापरता येणार नाही.