नवी दिल्ली : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ही सध्या तोट्यात असल्याचं दिसतंय. आपला खर्च कमी करण्यासाठी 'स्नॅपडील'ही आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याच्या विचारात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपली प्रतिस्पर्धी कंपनी 'फ्लिपकार्ट'सोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावत स्नॅपडीलनं आपल्या स्वतंत्र मार्गावर चालणं पसंत केलंय. 


या आठवड्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टची ९०-९५ करोड डॉलरची ऑफर कंपनीनं धुडकावून लावत आपल्या नव्या रोडमॅप 'स्नॅपडील २.०'वर काम करणं सुरु केलंय. 


यानुसार, येत्या दोन - तीन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून ५००- ६०० वर आणणार आहे. सध्या कंपनीत जवळपास १२०० कर्मचारी काम करत आहेत. 


यासंबंधी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी स्नॅपडीलला संपर्क करण्यात आला मात्र पाठवण्यात आलेल्या ई-मेलला कंपनीकडून उत्तर मिळालेलं नाही.