मुंबई : रिलायन्स जियो गिगा फायबरचे व्यावसायिक लॉन्चिंग अद्याप करण्यात आलेले नाही. पण लॉन्च होण्याच्या आधीच महत्वपूर्ण माहिती जगजाहीर झाल्या सारखीच आहे. त्यामुळे एयरटेल टेलीकॉम कंपनीने ब्रॉडबँड सेगमेंटच्या स्पर्धेत कायम राहण्यासाठी ग्राहकांसाठी विशेष सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. एयरटेलने ग्राहकांना तीन महिन्यांसाठी ऍमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन आणि नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन्स, डेटा कॅरी फॉरवर्ड ऑप्शन आणि जास्त मुदतीच्या प्लॅनमध्ये सवलत देत आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीने 6 महिन्यांच्या वैधतेसह 1000 जीबी किंवा 1 टीबी बोनस डेटा देखील देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी बोनस डेटा ऑफर फक्त 31 मार्च 2019 पर्यंत मर्यादीत ठेवण्यात आली होती. सध्या यात वाढ करण्यात आली आहे. पण अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. जर तुम्ही एयरटेल व्ही फायबर ब्रॉडबँड प्लॅनची निवड केली तर तुम्हाला 6 महिन्यांपर्यंत अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल. काही शहरांमध्ये एअरटेल व्ही-फायबर प्लॅन 399 रूपयांपासून सुरू होत आहे. 300 एमबीपीएस स्पीडच्या काही प्रिमियम प्लॅनची किंमत 2 हजार 199 रुपये आहे.


दिल्ली सारख्या काही शहरांमध्ये 494 रूपयांमध्ये मासिक योजना सुरू आहेत. परंतू ही योजना केवळ 6 ते 12 महिन्यांपर्यंत उपलब्ध आहे. एअरटेल या योजनांमध्ये कोणताही बोनस डेटा देत नाही. एअरटेल कंपनी 799 रूपयांच्या मासिक योजनेमध्ये बोनस डेटा उपलब्ध करून देत आहे. त्यामध्ये 40 एमबीपीएस स्पीडसह 100 जीबी FUP(Fair Usage Policy) डेटा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 999 रूपयांच्या मासिक योजनेमध्ये 1000 जीबी बोनस डेटा देण्यात आला आहे.       


एअरटेल कंपनीकडून 1 हजार 299 रूपयांच्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएस स्पीडसह 500 जीबी FUP डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1000 जीबी किंवा 1 टीबी बोनस डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या पोर्टफोलिओतील सर्वात महागडे प्लॅन असलेल्या 1 हजार 999 रूपयांमध्ये ग्राहकांना 1 हजार जीबी बोनस डेटा मिळणार आहे.