स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये `सर्कल बेस` अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडूनअर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'सर्कल बेस' अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडूनअर्ज मागविण्यात आले आहेत. निवडलेले उमेदवार फक्त अर्ज केलेल्या मंडळामध्येच भरती केले जातील, असे स्टेट बँकेतर्फे कळविण्यात आले आहे. या भरतीत एकूण जागा ३८५० भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात ५१७ जागा आहेत.
उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन करण्यापूर्वी उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी पात्रतेच्या तारखेप्रमाणे पदासाठी पात्रतेचे निकष पूर्ण केलेले असावेत. तसेच शुल्क भरण्यासाठी अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने फी जमा केली जाते तेव्हाच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेची वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/ Careers पाहणे गरजेचे आहे. कोणताही बदल, अद्ययावत बदल आणि स्वतंत्र सूचना जाहिरात देऊन केल्या जाणार नाहीत. तसेच ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२० ते १६ ऑगस्ट २०२० अशी आहे.
एकूण जागा – ३८५०
महाराष्ट्रात पदांची संख्या – ५१७ (मुंबई वगळून)
पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव
वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y
अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/32XUyWw