नवी दिल्ली : अनेकांच्या उत्सुकतेचे कारण ठरलेले अॅपलचे आयफोन८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन X हे तीन स्माटफोन नुकतेच लॉंच झाले. या फोनची चर्चा सर्वत्र होणे सहाजिकच. पण, त्यामुळे अॅपल कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जही चर्चेत आला आहे. महत्त्वाचे असे की, भारतात त्याची विशेष चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया, इंटरनेट, गुगल आदी ठिकाणांवर स्टीव्ह जॉब्जबाबत लिहीले वाचले जाते. पण, एक आनंदाची बाब अशी की, त्याचे भारतासोबत असलेले नाते. जॉब्जच्या इंडिया कनेक्शनची कहाणीही काही वेगळीच आहे. स्वत: स्टीव्ह जॉब्जनेही हे मान्य केले आहे. स्टीव्ह जॉब्जने भारतात येऊन उत्तराखंडमधील अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मंदिरांना भेटी दिल्यावर आपल्या आयुष्यात मोठा बदल झाल्याचेही स्टीव्ह जॉब्जने म्हटले आहे. मंदिरांमध्ये दर्शन घेऊन गेल्यावर स्टीव्हला अॅपल कंपनी स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.


विशेष म्हणजे स्टीव्हच्या अॅपल कंपनीचेही भारताशी विशेष नाते आहे. प्राप्त माहितीनुसार, १९७४च्या दरम्यान स्टीव्ह जॉब्ज आपल्या रूढ करिअरपेक्षा काही वेगळे करू इच्छित होते. दरम्यान, आपल्या मित्रांसोबत ते उत्तराखंडमध्ये आले. तिथे त्यांनी काही मंदिरांना भेटी दिल्या. याच काळात त्यांनी नैनीताल येथील नीम करौली बाबांच्या कैंची आश्रमालाही भेट दिली. त्यावेळी करौली बांबाचा मृत्यू झाला होता. इथेच फिरत असताना फावल्या वेळात 'ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन योगी' नावाचे एक पुस्तक जॉब्ज यांच्या वाचनात आले. स्वत: स्टीव्ह जॉब्ज यांनीही म्हटले आहे की, हे पुस्तक वाचल्यावर माझ्या विचारांमध्ये अमुलाग्र बदल झाला.


स्टीव्ह जॉब्ज म्हणतात, 'मी ते दिवस कधीच विसरणार नाही. ज्या काळात मी कॉलेज सोडायचा विचार केला होता. मित्रांसोबत मी जमीनवर झोपत असे. रविवारच्या सुट्टीत ११ किलोमीटर अंतर पायी चालत अन्नासाठी हरिकृष्ण मंदिरात जात असे'. जॉब्ज यांना भारतीय आध्यात्मात विशेष आवड आहे.


जॉब्ज यांच्यावर भारतीय आध्यात्माचा काहीसा अधिकच पगडा होता. भारतातून अमेरिकेला परतल्यावर जॉब्ज बौद्ध बनले. त्यांनी डोक्याचे मुंडन केले आणि भारतीय पारंपरिक कपडे वापरण्यास सुरूवात केली. मांसाहार त्यांनी पूर्णपणे वर्ज्य केला. भारतात आल्यावर १५ दिवसांच्या 'त्या' रिकाम्या काळात जॉब्ज यांनी सर्वाधीक सफरचंदच खाल्ली होती. त्यावरूनच त्यांना कंपनीचे नाव अॅपल ठेवावे अशी कल्पना सूचली.