Tata Altroz iCNG Launched In India: देशातील आघाडीची वाहनविक्रेता कंपनी असलेल्या टाटाने अल्ट्रोजचं सीएनजी (Tata Altroz iCNG) व्हर्जन लॉन्च केलं आहे. अल्ट्रोज आय सीएनजी (Altroz ​​iCNG) असं या गाडीचं नाव आहे. विशेष म्हणजे या कारची किंमत फारच परवडणारी आहे. टाटा अस्ट्रोजची आय सीएनजी व्हर्जन कार डाऊनटाऊन रेड, ऑर्कीड ग्रे, एवेन्यू व्हाइट आणि ओपेरा ब्लू या 4 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. मागील काही काळापासून कंपनीने बाजारात उतरलवलेली ही तिसरी सीएनजी कार ठरली आहे.


एकूण सहा व्हेरिएंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटाने बाजारात आणलेल्या टिगोर आणि टीयागोसारख्या मॉडेल्सच्या सीएनची व्हर्जननंतर ही कंपनीची तिसरी कार आहे जी सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. विशेष म्हणजे अस्ट्रोजमध्ये अनेक भन्नाट फिचर्सही देण्यात आले असून त्यात इलेक्ट्रिक सनरुफचाही समावेश आहे. तसेच वायरलेस चार्जींगची सुविधाही गाडीमध्ये देण्यात आली आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार अल्ट्रोजच्या या सीएनजीचे एकूण सहा व्हेरिएंट असतील. यात XE, XM+, XM+(S), XZ, XZ+(S) आणि XZ+O(S) या व्हेरिएंटचा समावेश असेल. गाडीमध्ये 1.2 लीटर रेवोट्रोन इंजिन आहे. हे इंजिन 6 हजार आरएमपीवर 73.5 पीएस पॉवर जनरेट करतं. तर 3 हजार 500 आरएमपीवर 103 एनएमचं टॉर्क निर्माण करण्याची क्षमता इंजिनमध्ये आहे.


अधिक बूट स्पेस ठेवण्यासाठी खास रचना


कारमधील बूट स्पेस जास्तीत जास्त राहील याकडे कंपनीने विशेष लक्ष दिलं आहे. यासाठी कंपनीने ट्विन सीएनजी सिलेंडर सिस्टीम गाडीत वापरली आहे. म्हणजेच सीएनजी सिलेंडर हा लगेज स्पेसखाली असल्याने मागे सामना ठेवता येईल. अल्ट्रोज आयसीएनजी व्हर्जन हे अत्याधुनिक सिंगल ईसीयूसहीत येते. हे तंत्रज्ञान वापरण्यात आलेली ही पहिलीच कार आहे ज्यामध्ये सीएनजी मोडवरील कार डायरेक्ट स्टार्ट करता येते.


अनेक फिचर्स...


कंपनीने गाडीमध्ये एकाहून एक सरस फीचर्स दिले आहेत. या हॅचबॅक सीएनजी कारमध्ये हेडलॅम्प आणि एलईडी डिआरएल देण्यात आले आहेत. तसेच गाडीमध्ये हरमन कंपनीचे 8 स्पिकर्स देण्यात आले आहेत. टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीमही गाडीत देण्यात आली आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टीमबरोबरच एसी रेअर व्हेंटही गाडीमध्ये दिलं आहे. 


कारची किंमत किती?


अल्ट्रोज आयसीएनजी कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 7 लाख 55 हजार (एक्स-शोरुम प्राइज) इतकी आहे. तर टॉप व्हेरिएंट 10 लाख 55 हजारांना (एक्स-शोरुम प्राइज) असेल. या गाडीला 1 लाख किमी किंवा 3 वर्ष अशी स्टॅण्डर्ड गॅरंटीही कंपनीने दिली आहे.