Tata ने लाँच केली सर्वात स्वस्त `सनरूफ` कार; 5-स्टार सेफ्टी रेटिंग, किंमत किती?
Tata Altroz ला नुकतंच सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता कंपनीने सर्व व्हेरियंटमध्ये सनरुफ फिचर दिलं आहे. ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे, जिच्यामध्ये सनरुफ फिचर आहे.
Tata Altroz Sunroof: टाटा मोटर्सने (Tata Motors) नुकतीच मार्केटमध्ये आपली प्रसिद्ध हॅचबॅक कार Tata Altroz च्या सीएनजी व्हेरियंटला (CNG Variant) लाँच केलं होतं. आता कंपनीने Altroz च्या सर्व व्हेरियंटला सनरुफ फिचरसह लाँच केलं आहे. हुंडाई आय 20 नंतर या सेगमेंटमध्ये सनरुफ असणारी ही दुसरी कार आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही सर्वात स्वस्त कार आहे जी सनरुफ फिचरसह बाजारात उपलब्ध आहे. सनरुफ फिचर असणाऱ्या या कारची सुरुवातीची किंमत 7 लाख 90 हजार रुपये इतकी आहे.
Tata कंपनीने Altroz कारला पेट्रोल आणि डिझेल इंजिनिसह एकूण 13 व्हेरियंटमध्ये सादर केलं आहे. Tata ने Altroz मध्ये मीड स्पेक XM+ट्रिम पासून सनरुफ सामाविष्ट करण्यात आलं आहे. पेट्रोल, टर्बो पेट्रोल, डिझेल आणि CNG पावरट्रेनमध्ये एकूण 16 व्हेरियंटमध्ये हे उपलब्ध आहे. सामन्यत: सनरुफ असणारे व्हेरियंट रेग्यूलर मॉडेलच्या तुलनेत 45 हजाराने महाग असतात. आता तर Altroz च्या डार्क एडिशनमध्येही सनरुफ मिळत.
याआधी Hyundai i20 च्या टॉप व्हेरियंट एस्टा आणि एस्टा (ऑप्शनल) ट्रिममध्येही सनरुफसारखं फिचर मिळत होतं. त्याची किंमत 9 लाख 3 हजार रुपयांपासून सुरु होत होती. त्याच्याशी तुलना करता Altroz या सेगमेंटमध्ये सध्या सर्वात स्वस्त कार ठरली आहे, जी सनरुफ फिचरसह उपलब्ध आहे. याशिवाय टाटाने या कारमध्ये वायरलेस चार्जर, एक एअर प्युरिफायर, लेदरेट अपहोल्स्ट्रीसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये आधी असणारे सर्व फिचरही तसेच ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, या कारच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कार पहिल्याप्रमाणे 86hp च्या 1.2 लीटर नॅच्यूरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 110hp च्या 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 90hp पॉवर आऊटपूटच्या 1.5 लीटर डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. याचा इंजिनांच्या आधारे स्टँडर्ड 5-स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. दरम्यान 1.2 लीट नॅच्यूरल एस्पिरेटेडमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्सचाही पर्याय मिळतो.
टाटाच्या प्रिमियम हॅचबॅकमध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरशी कनेक्टेड कार टेकसह 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळतो. यामध्ये एम्बिएंट लायटिंग आणि क्रूझ कंट्रोलही देण्यात आलं आहे. Tata Altroz कस्टमायजेशनचे अनेक पर्याय मिळतात. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित हॅचबॅक कारपैकी आहे. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, ISOFIX चाइल्ड सीट एंकर, ऑटो पार्क लॉक आणि रेअर पार्किंग सेन्सर्स मिळतात. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आलं आहे.